नाशिक : गेल्या काही दिवसापासून महायुतीत नाशिक लोकसभेत हायव्होल्टेज ड्रामा बघायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाकडे असलेली नाशिक लोकसभा मतदारसंघावर भाजपसह अजितदादांच्या राष्ट्रवादीने देखील दावा सांगितला आहे. अशातच काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नाशिक लोकसभेसाठी महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये नाशिकची जागा ही अजित पवार गटाला मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर आज सायंकाळी नाशिक लोकसभेसाठी मंत्री छगन भुजबळ यांची उमेदवारी जाहीर होणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…“नवनीत राणांना बजरंग बलीचा आशीर्वाद”, बहुमताने निवडून येतील,” देवेंद्र फडणवीसांचा एल्गार
नाशिक लोकसभा मतदारसंघातून सुरूवातीपासून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र त्यात भाजपचे नेते दिनकर पाटील यांनी आग्रह धरल्याने यात चांगलीच रंगत निर्माण झाली. अशातच आता नाशिकच्या जागेवर छगन भुजबळांनीही दावा सांगितल्याने महायुतीत या जागेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली. मागील काही दिवसापासून नाशिकच्या जागेची चर्चा सुरू आहे. अशातच काल झालेल्या बैठकीत नाशिकची जागा अजित पवार गटाला सोडणार असल्याची माहिती समोर येत आहे. याठिकाणी आज मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची घोषणा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी उमेदवारी मिळण्यासाठी मागील काही दिवसापासून खूप प्रयत्न करतांना दिसत आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील नाशिक मध्ये येत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र आता नाशिकच्या जागा अजित पवार गटाकडे केली तर हेमंत गोडसे काय भूमिका घेणार ? ते पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.
यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. काल भावना गवळी, हेमंत पाटील, त्याचबरोबर गजानन किर्तीकर, कृपाल तुमने यांना लोकसभा निवडणुकीत पुन्हा संधी देण्यात आलेली नाहीय. अशातच आता नाशिक लोकसभेतून हेमंत गोडसे यांची उमेदवारी नाकारली तर एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा नामुष्कीची वेळ येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“आठ दिवस ईडी सीबीआय माझ्याकडे द्या, मग मी..” संजय राऊतांचं मोठं विधान
दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ यांच्या उमेदवारीला भाजपसह शिंदे गटाचा देखील मोठा विरोध आहे. लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक असलेले भाजपचे दिनकर पाटील यांनी तर उघडउघड नाराजी व्यक्त केली आहे. भुजबळ यांनी केलेल्या घेतलेल्या भूमिकाबाबत मराठा समाजात प्रचंड नाराजी आहे.त्यामुळे भुजबळांना याठिकाणी उमदेवारी देऊ नये अशी मागणीच याठिकाणी करण्यात आली आहे. त्यामुळे आज नाशकात काय घडामोडी घडणार? त्याकडेही लक्ष लागून राहिलं आहे.
यातच नाशिकच्या जागेसंदर्भात शांतिगीरी महाराज यांनी देखील निवडणुक लढविणार असल्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती. मात्र महायुतीकडून छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भुजबळांना उमेदवारी दिल्यास भुजबळ विरूद्ध वाजे असा सामना होण्याची शक्यता आहे. तर शांतिगीरी महाराज आणि हेमंत गोडसे अपक्ष म्हणून निवडणूक लढणार का ? असा सवाल याठिकाणी उपस्थित केला जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“हडपसर विधानसभा मतदारसंघातून किमान ५० हजारांचा लीड देणार”, आढळरावांसाठी नाना भानगिरे यांचा निर्धार
पुण्यात कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये नाराजींचा सुळसुळाट ; रवींद्र धंगेकर अडचणीत
हेही वाचा.“परभणीत राजकीय वारं फिरलं, वंचितने तिसऱ्यांदा उमेदवार बदलला, ‘या’ प्रसिद्ध व्यक्तीला दिली उमेदवारी”
हेही वाचा…“मोदींचे हात बळकट करू, महायुतीचा उमेदवार विजयी करू”, हिंगोलीत मुख्यमंत्र्यांचा एल्गार
हेही वाचा…अर्चना पाटलांना अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर, धाराशिवमध्ये निंबाळकरांसमोर मोठं आव्हान