पुणे : मागच्या काही महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर कॉंग्रेसने रवींद्र धंगेकर यांना आता लोकसभेचीही उमेदवारी दिली आहे. कॉंग्रेसकडून अनेक जण लोकसभा निवडणुक लढण्यासाठी इच्छूक होते. मात्र कॉंग्रेसने धंगेकर यांना उमेदवारी दिल्याने आता इच्छुकांमध्ये नाराजीची लाट पसरली असल्याची माहिती समोर येत आहे. माजी उपमहापौर आबा बागुल यांनी तर जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त करत कॉंग्रेस भवनसमोरच ठिय्या दिला होता. तर दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये अंतर्गत कहल अजूनही तसाच असल्याचे दिसून येत आहे. काल धंगेकर यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी केसरीवाड्यामध्ये मेळावा पार पडला. यावेळी देखील हा वाद कायम राहिल्याने आता धंगेकर यांच्यासाठी डोकेदुखी ठरतांना दिसत आहे.
हेही वाचा..‘धक्कादायक बातमी…! शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखावर बीडमध्ये प्राणघातक हल्ला, बीड हादरलं…
केसरी वाड्यामध्ये आयोजित मेळाव्याला काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख गजानन थरकुडे, माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, जेष्ठ नेते अंकुश काकडे यांच्यासह महाविकास आघाडीचे इतर नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कसब्यातील पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला. मात्र एका बाजूला विजय मिळवण्याच्या आरोळ्या ठोकल्या जात असताना दुसरीकडे उपस्थित काँग्रेस नेत्यांमध्ये मात्र नवा वाद दिसून आला.
हेही वाचा…भाजप आमदाराची पत्नी घड्याळ चिन्हावर निवडणुक लढणार ? अर्चनाताई पाटील अजितदादा गटात दाखल ?
झालं असं की, महाविकास आघाडीचा मेळावा सुरू असताना रोहित टिळक हजर झाले, मात्र ते सभागृहात आल्यानंतर काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतल्याने चर्चेचा विषय बनला आहे. धंगेकरांची उमेदवारी जाहीर होऊन पंधरा दिवस उलटल्यानंतरही काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य कायम असल्याचं यावरून दिसून आलं. त्यामुळे कसबा पॅटर्नची चर्चा सुरू असली तरी नाराजीचा हा पॅटर्न मात्र धंगेकर यांची डोकेदुखी वाढवणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा.“परभणीत राजकीय वारं फिरलं, वंचितने तिसऱ्यांदा उमेदवार बदलला, ‘या’ प्रसिद्ध व्यक्तीला दिली उमेदवारी”
हेही वाचा…“मोदींचे हात बळकट करू, महायुतीचा उमेदवार विजयी करू”, हिंगोलीत मुख्यमंत्र्यांचा एल्गार
हेही वाचा…अर्चना पाटलांना अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर, धाराशिवमध्ये निंबाळकरांसमोर मोठं आव्हान
हेही वाचा…“नवनीत राणांना बजरंग बलीचा आशीर्वाद”, बहुमताने निवडून येतील,” देवेंद्र फडणवीसांचा एल्गार
हेही वाचा…“आठ दिवस ईडी सीबीआय माझ्याकडे द्या, मग मी..” संजय राऊतांचं मोठं विधान