बीड : महायुतीकडून विद्यमान खासदार प्रितम मुंडे यांचं तिकीट कापून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काल शरद पवारांनी बीड जिल्ह्यात मोठी खेळी करत बजरंग सोनवणे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविले आहे. मागच्या निवडणुकीत बजरंग सोनवणे यांनी प्रितम मुंडे यांना चांगलीच टक्कर दिली होती. त्यामुळे पुन्हा त्यांच्यावर विश्वास टाकण्यात आला आहे. यातच उमेदवारी जाहीर होतात सोनवणे यांनी आपल्या प्रचाराला सुरूवात करून दिली आहे. पहिल्याच वेळी त्यांनी पंकजा मुंडेंसह भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
हेही वाचा…अर्चना पाटलांना अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर, धाराशिवमध्ये निंबाळकरांसमोर मोठं आव्हान
बीडमध्ये पंकजा मुंडे यांचं मोठं आव्हान वाटतं का ? असा सवाल विचारले असता. त्यावर बीडमध्ये पंकजा मुंडे यांचं मला कोणतंही आव्हान नाही. मागच्या दहा वर्षांमध्ये इथल्या खासदाराने कोणतीही कामे केली नाहीत. त्यामुळे बीडकर त्यांच्यावर प्रचंड नाराज आहेत. यातच राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर प्रथमच याठिकाणी लोकसभा निवडणुक होत आहे. त्यावर धनंजय मुंडे कुणासोबत हे सांगता येणार नाही. असा टोला सोनवणे यांनी लगावला.
हेही वाचा…“नवनीत राणांना बजरंग बलीचा आशीर्वाद”, बहुमताने निवडून येतील,” देवेंद्र फडणवीसांचा एल्गार
दरम्यान, बीड जिल्ह्यात ओबीसी विरूद्ध मराठा असा संघर्ष बघायला मिळत आहे. त्यावर बोलतांना ते म्हणाले की, बीड जिल्ह्य हा सुसंस्कृत , स्वाभिमानी जिल्हा आहे. हा जिल्हा कुठल्या जातीपातीवर सर्वधर्मभाव चालणारा आहे. बीड जिल्ह्याचा विकास मागील दहा ते पंधरा वर्षांमध्ये काहीही झालेला नाहीय. त्यामुळे बीड जिल्ह्याचा विकास हा आमचा ध्येय धोरण आहे. अशी प्रतिक्रिया बजरंग सोनवणे यांनी दिलीय.
READ ALSO :
हेही वाचा…नाशकात ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ ,शिंदेंवर पुन्हा नामुष्की, नाशकात भुजबळांना उमेदवारी ?
हेही वाचा…“हडपसर विधानसभा मतदारसंघातून किमान ५० हजारांचा लीड देणार”, आढळरावांसाठी नाना भानगिरे यांचा निर्धार
पुण्यात कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये नाराजींचा सुळसुळाट ; रवींद्र धंगेकर अडचणीत
हेही वाचा.“परभणीत राजकीय वारं फिरलं, वंचितने तिसऱ्यांदा उमेदवार बदलला, ‘या’ प्रसिद्ध व्यक्तीला दिली उमेदवारी”
हेही वाचा…“मोदींचे हात बळकट करू, महायुतीचा उमेदवार विजयी करू”, हिंगोलीत मुख्यमंत्र्यांचा एल्गार