सांगली : महाविकास आघाडीतील सांगलीच्या जागेवरून कॉंग्रेस आणि ठाकरे गटात चांगलाच वाद निर्माण झाला आहे. सांगलीच्या जागेसाठी कॉंग्रेसकडून विशाल पाटील निवडणुक लढण्यास इच्छूक होते. मात्र त्याठिकाणी ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याने कॉंग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केलीय.अशातच आता संजय राऊत सध्या सांगलीच्या दौऱ्यावर आले असता कॉंग्रेसच्या नेत्यांनी पाठ फिरवली असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा...पुण्यात कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये नाराजींचा सुळसुळाट ; रवींद्र धंगेकर अडचणीत
संजय राऊत सध्या सांगलीच्या दौऱ्यावर आले आहे. मात्र राऊतांच्या कार्यक्रमांना कॉंग्रेसचे नेते गैरहजर राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. विशाल पाटील हे मुंबई आहेत तर विश्वजीत कदम हे पुण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्याचे कॉंग्रेसचे अध्यक्ष विक्रम सावंत हे जत मतदारसंघात आहेत. सांगली लोकसभा मतदार संघावर कॉंग्रेसकडून दावा करण्यात आला आहे आणि या लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपुर्ण लढत घेण्यात यावी असा प्रस्ताव राज्यातील कॉंग्रेस नेत्यांनी दिली होता. पण त्यावर अजूनही दिल्लीतील कॉंग्रेस नेत्यांकडून उत्तर आलं नाही. त्यामुळे सांगलीतील कॉंग्रेस नेत्यांची ठाकरे गटावर नाराजी आहे.
हेही वाचा...“परभणीत राजकीय वारं फिरलं, वंचितने तिसऱ्यांदा उमेदवार बदलला, ‘या’ प्रसिद्ध व्यक्तीला दिली उमेदवारी”
दरम्यान, रामटेक, कोल्हापुरची जागा जशी आम्ही कॉंग्रेसला सोडलीय. तसा कॉंग्रेसने आता सांगलीचा विषय सोडून द्यावा. आम्हाला चंद्रहार पाटलांना दिल्लीत पाठवयाचं आहे. त्यामुळे सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. असे राऊतांनी सांगितलं आहे. त्यामुळे राऊतांच्या या तीन दिवसीय सांगलीच्या दौऱ्यात नेमक्या काय घडामोडी घडणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा...शिवसेना, राष्ट्रवादीतील फुट कोल्हेंच्या पथ्यावर पडणार ? शिरूरचं राजकीय गणितं काय ?
हेही वाचा...सुडाचं राजकारण..! कालच शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर, आज भिवंडीत बाळ्यामामा म्हात्रेंच्या गोदामांवर कारवाई
हेही वाचा…उमेदवारी जाहीर होताच बजरंग सोनवणेंचा भाजपवर हल्लाबोल, म्हणाले, धनंजय मुंडे कुणासोबत..,
हेही वाचा…नाशकात ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ ,शिंदेंवर पुन्हा नामुष्की, नाशकात भुजबळांना उमेदवारी ?
हेही वाचा…“हडपसर विधानसभा मतदारसंघातून किमान ५० हजारांचा लीड देणार”, आढळरावांसाठी नाना भानगिरे यांचा निर्धार