पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघात यंदा चांगलीच लढत होणार आहे. मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून डॉ. अमोल कोल्हे यांनी सलग तीन टर्म वेळा निवडून आलेल्या शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. आता पुन्हा एकदा आढळराव पाटील लोकसभेची निवडणुक लढत आहे, मात्र यावेळी ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हावर उतरले आहेत. तर डॉ. कोल्हे राष्ट्रवादीच्या कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर लढत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात फुट, राज्यात झालेले राजकीय बदल यामुळे ही निवडणुक चांगलीच चर्चेत राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा...“परभणीत राजकीय वारं फिरलं, वंचितने तिसऱ्यांदा उमेदवार बदलला, ‘या’ प्रसिद्ध व्यक्तीला दिली उमेदवारी”
राज्यात शिवसेनेसह राष्ट्रवादी पक्षात देखील मोठी फुट पडली असून याचा फटका उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. २०१९ साली अमोल कोल्हे यांनी जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर येथे आघाडी घेतली होती. तर भोसरी आणि हडपसर येथे आढळराव पाटलांना मोठ्या प्रमाणात लीड मिळालं होतं. आता शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच आमदार महायुतीत सहभागी आहेत. अशातच जुन्नरमध्ये अतुल बेनके, आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील तर खेड-आळंदीमधून दिलीप मोहिते पाटील हे अजित पवार गटात आहेत. त्यामुळे याठिकाणी आढळराव पाटलांना ताकद मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“मोदींचे हात बळकट करू, महायुतीचा उमेदवार विजयी करू”, हिंगोलीत मुख्यमंत्र्यांचा एल्गार
दुसऱ्या बाजूला हडपसर आणि भोसरी विधानसभेत मागच्यावेळी आढळरावांना चांगलं मताधिक्य मिळालं होतं. यावेळीही भोसरीचे आमदार महेश लांगडे तर हडपसरचे आमदार चेतन तुपे हे महायुतीत आहेत. त्यामुळे याठिकाणांहूनही आढळराव पाटलांना लीड मिळणार असल्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीसोबत असलेले एकमेव आमदार अशोक पवार यांनी कोल्हेंना पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे याठिकाणी आढळराव पाटलांची ताकद अधिक दिसून येत आहे.
दरम्यान, भोसरी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या मोशी, चिखली, चऱ्होलीस भोसरी गावठाण या भागात २०१९ च्या निवडणुकीत आढळराव पाटलांना एक लाख २५ हजार ३३६ मते तर कोल्हे यांना ८८ हजार २५९ मते मिळाली होती. आढळरावांनी याठिकाणी ३७ हजार ७७ मतांची आघाडी घेतली होती. त्यामुळे याठिकाणांहून यंदा आढळरावांना पुन्हा आघाडी मिळणार का ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा...सुडाचं राजकारण..! कालच शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर, आज भिवंडीत बाळ्यामामा म्हात्रेंच्या गोदामांवर कारवाई
हेही वाचा…उमेदवारी जाहीर होताच बजरंग सोनवणेंचा भाजपवर हल्लाबोल, म्हणाले, धनंजय मुंडे कुणासोबत..,
हेही वाचा…नाशकात ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ ,शिंदेंवर पुन्हा नामुष्की, नाशकात भुजबळांना उमेदवारी ?
हेही वाचा…“हडपसर विधानसभा मतदारसंघातून किमान ५० हजारांचा लीड देणार”, आढळरावांसाठी नाना भानगिरे यांचा निर्धार
पुण्यात कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये नाराजींचा सुळसुळाट ; रवींद्र धंगेकर अडचणीत