जळगाव : विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पत्ता कट केल्याने जळगावात आता भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. उन्मेष पाटील यांच्या जागी भाजपने स्मिता वाघ यांना लोकसभेची उमेदवारी दिली. त्यानंतर पाटील यांनी ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला. यातच आता जळगावातील ३० नगरसेवक ठाकरे गटात दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे भाजपमध्ये आता एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा…उमेदवारी जाहीर होताच बजरंग सोनवणेंचा भाजपवर हल्लाबोल, म्हणाले, धनंजय मुंडे कुणासोबत..,
उन्मेष पाटील यांनी जळगावात भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने जळगावात जोरदार बैठका सुरू झाल्या आहेत. यातच जळगावातील महापालिकेत लोकप्रतिनिधी असलेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना भाजपचे ३० पैकी जास्तीत जास्त नगरसेवक फोडण्याची मोठी जबाबदारी देण्यात आलीय. ही बातमी फुटल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी थेट बैठकांचा सपाटा घेत नगरसेवकांची चांगलीच झाडाझडती घेतली. यावेळी आपल्या प्रभागातून लीड मिळालं नाही तर पुढच्या निवडणुकीत तिकीट मिळणार नाही, अशी तंबीच गिरीश महाजन यांनी दिली आहे.
हेही वाचा…नाशकात ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ ,शिंदेंवर पुन्हा नामुष्की, नाशकात भुजबळांना उमेदवारी ?
जळगावात मागील काही वर्ष याठिकाणी भाजपची सत्ता राहिली आहे. मात्र भाजपने विद्यमान खासदाराचा पत्ता कट करून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. यानंतर पक्षात काम करू दिलं जात नाही. ऐकलं जात नाही. असं म्हणत उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला. मात्र ठाकरेंनी पाटील यांचे कट्टर समर्थक असलेल्या करण पवारांना उमेदवारी दिलीय. मात्र या उमेदवारीवर पाटील नाराज नसून त्यांनी करण पवारांसाठी काम करण्याचं ठरवलं आहे.
दरम्यान, जळगावात भगवा फडकवण्यासाठी ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सुचना दिल्या आहेत. उन्मेष पाटील यांनी देखील आपली यंत्रणा कामाला लावली असून स्मिता वाघ यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे जळगावात राजकीय वातावरणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अन् वसंत मोरेंनी ससून रूग्णालयाला भेट दिला उंदिर पकडण्याचा पिंजरा, दिला ‘हा’ इशारा
हेही वाचा..“बारामतीची लढाई कौटुंबिक नाही, भावनावश होऊ नका, भविष्याचा विचार करा,” सुनेत्रा पवार
हेही वाचा…कॉंग्रेसच्या नेत्यांनी राऊतांच्या कार्यक्रमाला फिरवली पाठ ; सांगलीच्या जागेवरून वाद आणखी वाढला
हेही वाचा...शिवसेना, राष्ट्रवादीतील फुट कोल्हेंच्या पथ्यावर पडणार ? शिरूरचं राजकीय गणितं काय ?
हेही वाचा...सुडाचं राजकारण..! कालच शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर, आज भिवंडीत बाळ्यामामा म्हात्रेंच्या गोदामांवर कारवाई