बारामती : कुटुंब आहे तिथेच आहे. माझा पक्ष आणि माझ्या प्रतिस्पर्ध्यांसाठी निवडणूक हा भाग वेगळा आहे. ही निवडणुक कौटुंबिक नाही. त्यांना मिळालेल्या उमेदवारीने बारामतीत अनेक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मतदारांना भावनावश होऊ नका, भविष्याचा विचार करा असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी मतदारांना केलं आहे. सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभेतून उमेदवारी जाहीर केली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी आता प्रचाराला सुरूवात केला असून त्यांच्यापुढे विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांचं मोठं आव्हान असणार आहे.
हेही वाचा…“हडपसर विधानसभा मतदारसंघातून किमान ५० हजारांचा लीड देणार”, आढळरावांसाठी नाना भानगिरे यांचा निर्धार
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, सध्याच्या राजकीय परिस्थितीत माझ्या पतीच्या बाजूनं उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे मी लोकसभा निवडणूक लढवीत आहे आणि मला विश्वास आहे की या निवडणुकीत आम्ही विजयी होऊ. अस म्हणत उपमुख्यमंत्र्यांनी एनडीएमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना पक्षातील जवळ जवळ ८० टक्के नेते-कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळाला. ज्यांना ज्यांना पाठिंबा दिला त्यांना माहित होतं की निर्णय देशाच्या भविष्यासाठी आणि प्रगतीसाठी आहे. असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा...पुण्यात कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये नाराजींचा सुळसुळाट ; रवींद्र धंगेकर अडचणीत
यातच माझा भाऊ आणि इतर लोक बऱ्याच काळापासून राजकारणात असल्यामुळे माझ्याकडेही राजकारणाची पार्श्वभूमी आहे. माझ्या कुटुंबातील काही सदस्य प्रतिस्पर्धी उमेदवाराचा प्रचार करीत आहेत हे खरे आहे. पण माझ्या पतीच्या कुटुंबातील अनेक सदस्य तसेच माझ्या पालकांच्या कुटुंबातील नातेवाईकांनी माझा प्रचार सुरू केला असल्याचे त्यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…कॉंग्रेसच्या नेत्यांनी राऊतांच्या कार्यक्रमाला फिरवली पाठ ; सांगलीच्या जागेवरून वाद आणखी वाढला
हेही वाचा...शिवसेना, राष्ट्रवादीतील फुट कोल्हेंच्या पथ्यावर पडणार ? शिरूरचं राजकीय गणितं काय ?
हेही वाचा...सुडाचं राजकारण..! कालच शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर, आज भिवंडीत बाळ्यामामा म्हात्रेंच्या गोदामांवर कारवाई
हेही वाचा…उमेदवारी जाहीर होताच बजरंग सोनवणेंचा भाजपवर हल्लाबोल, म्हणाले, धनंजय मुंडे कुणासोबत..,
हेही वाचा…नाशकात ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ ,शिंदेंवर पुन्हा नामुष्की, नाशकात भुजबळांना उमेदवारी ?