पुणे : गेल्या अनेक महिन्यांपासून ससून रूग्णालय चर्चेचा विषय ठरला आहे. ललित पाटील ड्रग्जमुळे तर ससून रूग्णालय संपुर्ण महाराष्ट्रात चर्चेत आलं होतं. अशातच आता आणखी एका घटनेमुळे ससून रूग्णालय चर्चेचा विषय ठरला आहे. रूग्णालयात आयसीयू विभागात अॅडमिट रूग्णाला उंदराने चावा घेतल्याने तरूणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. यावरून वंचितने आक्रमक भूमिका घेत थेट रूग्णालय गाठलं आहे.
हेही वाचा…नाशकात ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ ,शिंदेंवर पुन्हा नामुष्की, नाशकात भुजबळांना उमेदवारी ?
वंचितकडून उमेदवारी जाहीर झालेले वसंत मोरे यांनी थेट ससून रूग्णालय गाठलं आहे. आयसीयूमध्ये उंदीर चावल्याने झाला. तरुणाचा मृत्यू पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये अपघाताने जखमी झालेल्या तरुणाला ससून हॉस्पिटलच्या ICU विभागात ऍडमिट असतांना त्या तरुणाला उंदराने चावा घेतल्यामुळे त्या तरुणाचा मृत्यू झाला. म्हणून ससून रुग्णालयाच्या विरोधात हॉस्पिटलच्या मुख्य अधिकाऱ्याच्या दालनात जाऊन त्यांना यावेळी वंसत मोरेंसह वंचितच्या कार्यकर्त्यांनी उंदराचे पिंजरे भेट दिले.
हेही वाचा…“हडपसर विधानसभा मतदारसंघातून किमान ५० हजारांचा लीड देणार”, आढळरावांसाठी नाना भानगिरे यांचा निर्धार
दरम्यान, जर जबाबदार लोकांवर कारवाई केली नाही आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतले गेले नाहीत, तर भविष्यात यापेक्षाही मोठे पिंजरे आणून संबंधित अधिकाऱ्यांना पिंजऱ्यात कोण येतील, असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने देण्यात आला. यावेळी वंचित बहूजन आघाडीचे पुणे लोकसभा उमेदवार वसंत तात्या मोरे, शहराध्यक्ष मुन्नवर कुरेशी, प्रफुल्ल गुजर यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
वंचितचे वसंत मोरे यांनी
ससूनला दिले पिंजरे..!आयसीयूमध्ये उंदीर चावल्याने झाला तरुणाचा मृत्यू
पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये अपघाताने जखमी झालेल्या तरुणाला ससून हॉस्पिटलच्या ICU विभागात ऍडमिट असतांना त्या तरुणाला उंदराने चावा घेतल्यामुळे त्या तरुणाचा मृत्यू झाला.
म्हणून ससून… pic.twitter.com/VYjCVAmVHd
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) April 5, 2024
READ ALSO :
हेही वाचा..“बारामतीची लढाई कौटुंबिक नाही, भावनावश होऊ नका, भविष्याचा विचार करा,” सुनेत्रा पवार
हेही वाचा…कॉंग्रेसच्या नेत्यांनी राऊतांच्या कार्यक्रमाला फिरवली पाठ ; सांगलीच्या जागेवरून वाद आणखी वाढला
हेही वाचा...शिवसेना, राष्ट्रवादीतील फुट कोल्हेंच्या पथ्यावर पडणार ? शिरूरचं राजकीय गणितं काय ?
हेही वाचा...सुडाचं राजकारण..! कालच शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर, आज भिवंडीत बाळ्यामामा म्हात्रेंच्या गोदामांवर कारवाई
हेही वाचा…उमेदवारी जाहीर होताच बजरंग सोनवणेंचा भाजपवर हल्लाबोल, म्हणाले, धनंजय मुंडे कुणासोबत..,