नागपुर : मागील काही वर्षांपासून भाजपने कॉंग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करत सत्ता काबीज केली. मात्र या निवडणुकीत भाजपने राज्यात घराणेशाहीची पंरपरा पाळ्याचे काही मतदारसंघात दिसून येत आहे. विदर्भातील लोकसभेच्या दहापैकी चार मतदारसंघात घराणेशाहीची परंपरा पुढे चालवणारे उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे लोकसभेचं बिगुल वाजलं आहे. मात्र दोन्ही बाजूंनी घराणेशाहीला अधिक महत्व दिल्याचे उमेदवारीवरून दिसून येत आहे.
हेही वाचा…““निवडणुकीसाठी समोर प्रचंड माया गोळी गेलीय,”मुश्रीफांच्या हेलिकॉप्टरच्या विधानाचा जयंत पाटलांनी घेतला समाचार
अकोल्यात भाजपने विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिलीय. तर त्यांच्याविरोधात कॉंग्रेसने डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी दिलीय. घराणेशाहीवर सर्वात जास्त टिका ही भाजपने केलीय. मात्र महाराष्ट्रातील भाजपने अनुत्र धोत्रे यांना उमेदवारी देऊन घराणेशाहीच्या परंपरेला अधिक प्रोत्साहन दिल्याने आता भाजपवरच टिका होतांना दिसत आहे. भाजपने गांधी घराणेशाहीवरही टिका केलीय. यात महाराष्ट्रातील नेते देखील हिरीरीने सहभाग घेतांना दिसत आहे.
ऐनवेळी कॉंग्रेसकडून आयात केलेल्या उमेदवाराला शरद पवार यांनी वर्ध्यातून उमेदवारी दिलीय. कॉंग्रेसचे नेते असलेल्या अमर काळे यांना शरद पवारांनी वर्धा लोकसभेतून उमेदवारी जाहीर केलीय. अमर काळे यांचे वडील शरद काळे हे पुर्वाश्रमीच्या समाजवादी कॉंग्रेसचे म्हणजे पवार यांच्याच पक्षाचे आमदार होते. पवारांसोबत तेही कॉंग्रेसमध्ये आले. मात्र पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादीत काळे आले नाहीत. आता पुन्हा काळे यांना आपल्याकडे घेत उमेदवारी दिलीय. यातच आता काळे यांची लढत पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे व नंतर भाजपमध्ये गेलेल्या रामदास तडस यांच्यासोबत आहे.
हेही वाचा…“चला भेटूया, मताधिक्य गाठूया’”, मुरलीधर मोहोळांच्या विजयासाठी महायुती मैदानात
घराणेशाहीची परंपरा जोपण्यासाठी कॉंग्रेस देखील मागे हटली नाही. चंद्रपुर लोकसभा मतदारसंघातून दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर केलीय. २०१९ साली कॉंग्रेस एकमेव खासदार निवडून आले होते. त्यात बाळू धानोरकर यांचं नाव होतं. यात धानोरकर हे पुर्वाश्रमीचे शिवसैनिक होते. तेथून ते कॉंग्रेसमध्ये आले आहे. त्यांच्या निधनानंतर आता प्रतिभा धानोरकर यांचा सामना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी होणार आहे.
दरम्यान, यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचा विषय यापेक्षा वेगळा राहिला आहे. ती ठरवून झालेली नाही तर पक्ष नेतृत्वाची अपरिहार्यता याला कारणीभूत ठरली आहे. येथील उमेदवार जयश्री पाटील या हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत. त्यांनी उमेदवारी मागितली नव्हती. पण त्यांचे पती हेमंत पाटील यांची जाहीर झालेली उमेदवारी एनवेळी बदलण्यात आलीय. ही नामुष्की शिंदे सेनेवर आल्यामुळे त्याची भरपाई करण्यासाठी जयश्री पाटील यांना संधी मिळालीय.
READ ALSO :
हेही वाचा…“जागा मिळाली नाही तर कॉंग्रेसचे सगळे नेते राजीनामा देणार”, आघाडीत ‘या’ जागेवरून कॉंग्रेसची आक्रमक भूमिका
हेही वाचा…प्रणिती शिंदेंनी सोडवला पाणी वाटपाचा प्रश्न ; आचारसंहितेमधून मिळणार मुभा
हेही वाचा..“बाळासाहेबांच्या रिमोट कंट्रोलने चालणाऱ्या कमळाबाईंच्या रिमोट कंट्रोलने आता शिंदेंची शिवसेना चालते”
हेही वाचा…विजय शिवतारेंची मागणी, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सासवडमध्ये सुनेत्रा पवारांसाठी जाहीर सभा
हेही वाचा…“सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार”, आघाडीत पेच वाढला, विशाल पाटलांनी जाहीर केली आपली भूमिका