मुंबई : महायुतीत चर्चेत असलेल्या कल्याण लोकसभेचा तिढा अखेर सुटलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी घोषीत केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून श्रीकांत शिंदेंचं तिकीट कापलं जाईल, अशी चर्चा होती. त्यावर आता फडणवीस यांनी पुर्णविराम दिला आहे. मात्र इतर लोकसभा मतदारसंघाबाबतचा तिढा अजूनही तसाच असून पुढे काय घडामोडी घडणार त्याकडे लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा…“उमेदवारी मिळाली नाही तर विशाल पाटील बंडखोरी करणार का ?” विश्वजीत कदम म्हणाले..
विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात प्रचंड विरोध केला होता. यातच सध्या अनेक मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या गटातील उमेदवारांचं तिकीट कापलं जात आहे. त्यावरून श्रीकांत शिंदे यांचं देखील तिकीट कापलं जाईल अशी चर्चा होती. मात्र काल देवेंद्र फडणवीस यांनी संपुर्ण महायुती श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करील आणि ती जागा जिंकून येईल. असे म्हटल्यानंतर कल्याण जागेचा तिढा सुटला असल्याचे संकेत दिले आहेत.
हेही वाचा…शरद पवारांनी नाकारलं, वंचित तारणार ? बीडमध्ये ज्योती मेटे यांना वंचितकडून उमेदवारी ?
नाशिक जागेवरून शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. याठिकाणी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा पत्ता कट करून त्यांच्या जागी मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा सुरू आहे. भाजपचे दिनकर पाटील देखील इच्छूक असून त्यांनी देखील लढण्याची भाषा केली आहे. त्यावरून महायुतीत मोठा वाद निर्माण होऊ शकतो.
दरम्यान, श्रीकांत शिंदे यांची उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानंतर कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी टोला लगावला आहे. महायुतीची महाशक्ती भाजपा आहे. यात कधीच शंका नव्हती. त्यामुळेच आता शिवसेनेचे उमेदवार कोण असावेत, विद्यमान खासदारांची उमेदवारी कापली जाणे हे निर्णयही भाजपा घेताना दिसते. आता मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राची उमेदवारीही फडणवीसजींनी घोषित केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या रिमोट कंट्रोलने एकेकाळी चालणाऱ्या कमळाबाईच्या रिमोट कंट्रोलने आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना चालते आहे हे स्पष्ट आहे. असा टोलाही त्यांनी लगावला.
महायुती ची महाशक्ती भाजपा आहे यात कधीच शंका नव्हती. त्यामुळेच आता शिवसेनेचे उमेदवार कोण असावेत, विद्यमान खासदारांची उमेदवारी कापली जाणे हे निर्णयही भाजपा घेताना दिसते. आता मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राची उमेदवारीही फडणवीसजींनी घोषित केली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या…
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 6, 2024
READ ALSO :
हेही वाचा…विजय शिवतारेंची मागणी, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सासवडमध्ये सुनेत्रा पवारांसाठी जाहीर सभा
हेही वाचा…“सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार”, आघाडीत पेच वाढला, विशाल पाटलांनी जाहीर केली आपली भूमिका
हेही वाचा…““निवडणुकीसाठी समोर प्रचंड माया गोळी गेलीय,”मुश्रीफांच्या हेलिकॉप्टरच्या विधानाचा जयंत पाटलांनी घेतला समाचार
हेही वाचा…“चला भेटूया, मताधिक्य गाठूया’”, मुरलीधर मोहोळांच्या विजयासाठी महायुती मैदानात
हेही वाचा..“आधी प्रखर विरोध, आता आढळरावांच्या प्रचारासाठी मैदानात,” अजितदादांचा ‘हा’ शिलेदार लागला कामाला