बारामती : महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी आता महायुतीचे दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. काल देवेंद्र फडणवीस यांनी पुरंदरमध्ये सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ता मेळावा घेतला. तर दुसऱ्या बाजूला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील १२ एप्रिल रोजी सासवडमध्ये जाहीर सभा होत आहेत.अजित पवारांच्या सभा बारामतीत होत आहेतच. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्यासाठी आता महायुती कामाला लागल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा…शरद पवारांनी नाकारलं, वंचित तारणार ? बीडमध्ये ज्योती मेटे यांना वंचितकडून उमेदवारी ?
सुरूवातीला शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर त्यांनी मवाळ भूमिका घेत सुनेत्रा पवारांना बहुमताने विजयी करण्याचं काम करणार असल्याचे जाहीर केले. यातच आता विजय शिवतारे यांच्या विनंतीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सासवड येथे सभा पार पडणार आहे. या सभेतून महायुतीचे नेते काय बोलणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.तर सासवडच्या सभेनंतर विजय शिवतारे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी सक्रिय होणार आहेत.
हेही वाचा…“पटोले भर सभेत एका खासदाराच्या ‘मृत्यूची कामना’ करतात? असंवेदनशीलतेचा हा कहर”, फडणीसांचं कॉंग्रेसवर टिकास्र
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघात लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. ठिकठिकाणी लोक जोरदार स्वागत करीत आहेत. बारामतीत फारशी काम नाहीत परंतु बारामती मतदारसंघातील इतर तालुक्यांमध्ये खुप काम राहिली आहेत. ती सर्व कामे करायची आहेत. यामध्ये शेतकऱ्यांची मोठी कामे असून लोकांनी संधी दिली तर आगामी काळात ती कामे निश्चितपणे पुर्ण केली जातील. अशी प्रतिक्रिया सुनेत्रा पवार यांनी दिलीय.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्यासमोर तीन टर्म खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळे यांचं मोठं आवाहन असणार आहे. त्यामुळेच अजितदादांनी सगळी यंत्रणा आता सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी लावून दिली आहेत. यातच काल देवेंद्र फडणवीस पुरंदरमध्ये दाखल झाले होते. यावेळी सुप्रिया सुळे यांच्या प्रचार प्रमुखांनी देखील फडणवीसांची भेट घेतल्याने एकच चर्चा सुरू झालीय. त्यामुळे सुनेत्रा पवारांना विजयी करण्यासाठी आता महायुती जोमाने कामाला लागल्याचे दिसू लागले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार”, आघाडीत पेच वाढला, विशाल पाटलांनी जाहीर केली आपली भूमिका
हेही वाचा…““निवडणुकीसाठी समोर प्रचंड माया गोळी गेलीय,”मुश्रीफांच्या हेलिकॉप्टरच्या विधानाचा जयंत पाटलांनी घेतला समाचार
हेही वाचा…“चला भेटूया, मताधिक्य गाठूया’”, मुरलीधर मोहोळांच्या विजयासाठी महायुती मैदानात
हेही वाचा..“आधी प्रखर विरोध, आता आढळरावांच्या प्रचारासाठी मैदानात,” अजितदादांचा ‘हा’ शिलेदार लागला कामाला
हेही वाचा…“उमेदवारी मिळाली नाही तर विशाल पाटील बंडखोरी करणार का ?” विश्वजीत कदम म्हणाले..