सांगली : लोकसभा निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान काही दिवसात होणार आहे. मात्र महाविकास आघाडीत काही मतदारसंघावरून चांगलाच वाद सुरू झाला आहे. अशातच सांगलीच्या जागेसाठी उद्धव ठाकरे यांनी आपल्या उमेदवाराची घोषणा आधीच केल्याने याठिकाणी कॉंग्रेस आणि ठाकरे गटातला संघर्ष अधिकच वाढत चालला आहे. ठाकरेंनी सांगलीसाठी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषीत केली आहे. तर दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसचे विशाल पाटील याठिकाणी निवडणुक लढण्यास इच्छूक आहेत. त्यांनी आता आपली भूमिका जाहीर केलीय.
हेही वाचा…“पटोले भर सभेत एका खासदाराच्या ‘मृत्यूची कामना’ करतात? असंवेदनशीलतेचा हा कहर”, फडणीसांचं कॉंग्रेसवर टिकास्र
विशाल पाटील यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांना पत्र लिहीत आपली भूमिका स्पष्ट केलीय. त्यांनी असं म्हटलंय की, मागच्या काही वर्षात सांगली काँग्रेसचा अनेक आघाड्यांवर संघर्ष सुरू आहे. सांगलीकरांच्या विकासासाठी आपण सत्ताधाऱ्यांविरुद्ध सातत्याने संघर्ष करत आहेत. काँग्रेसनेच जिल्ह्यात विकासरुपी गंगेच्या माध्यमातून सांगलीचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यामुळे सांगली काँग्रेसची आणि काँग्रेस सांगलीची असं समीकरणच तयार झालं आहे.
स्वर्गीय वसंतदादा पाटील, स्व. पतंगराव कदम साहेब, स्व. गुलाबराव पाटील साहेब, स्व. प्रकाशबापू पाटील, स्व. मदनभाऊ पाटील, स्व. आर आर पाटील, शिवाजीराव देशमुख अशा अनेक दिग्गज नेत्यांनी सांगलीच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली हे तुम्हाला ठावूकच आहे. त्यामुळे काँग्रेस आणि सांगलीचं अतुट नात तयार झालं आहे.
हेही वाचा…“मुहुर्त ठरू तर द्या..”, खडसेंच्या भाजप प्रवेशावर गिरीश महाजनांचं सुचक विधान, राजकीय वर्तुळात चर्चा
सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सांगलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपणही सर्वजण लढण्यासाठी सज्ज झालो आहोत. मला काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय. शिवाय सर्व नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने सांगली काँग्रेसचीच या भूमिकेवर ठाम आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने विश्वजित कदम साहेब सर्व प्रयत्न करत आहेत. या आधीच्या काळात तुम्ही सर्व जण पक्षाच्या आणि माझ्या पाठीमागे खंबीरपणे आहात याबद्दल मी तुम्हा सर्वांचा अत्यंत आभारी आहे. तुमची खंबीर साथ अशीच सोबत राहो. आपणा सर्वांना विश्वास आहे कि, सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार आहे.
तुम्ही सर्वांनी सांगलीच्या प्रगतीसाठी आतापर्यंत दाखवलेला संयम असाच आणखी काही दिवस ठेवा. सांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत नक्कीच चांगली बातमी येईल याची मला खात्री आहे. आपल्याला काँग्रेसचा हा गड मोठ्या ताकदीने केवळ लढवायचा नाही, तर जिंकायचा आहे. आपण लढू आणि जिंकू…
READ ALSO :
हेही वाचा…““निवडणुकीसाठी समोर प्रचंड माया गोळी गेलीय,”मुश्रीफांच्या हेलिकॉप्टरच्या विधानाचा जयंत पाटलांनी घेतला समाचार
हेही वाचा…“चला भेटूया, मताधिक्य गाठूया’”, मुरलीधर मोहोळांच्या विजयासाठी महायुती मैदानात
हेही वाचा..“आधी प्रखर विरोध, आता आढळरावांच्या प्रचारासाठी मैदानात,” अजितदादांचा ‘हा’ शिलेदार लागला कामाला
हेही वाचा…“उमेदवारी मिळाली नाही तर विशाल पाटील बंडखोरी करणार का ?” विश्वजीत कदम म्हणाले..
हेही वाचा..शरद पवारांनी नाकारलं, वंचित तारणार ? बीडमध्ये ज्योती मेटे यांना वंचितकडून उमेदवारी ?