कोल्हापुर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैऱ्या सुरू झाल्या आहेत. अशातच कोल्हापुर लोकसभेसाठी महायुतीकडून संजय मंडलिक यांना उमेदवार देण्यात आली. याच अनुषंगाने मंडलिकांसाठी वेळ पडल्यास मतदारांना हेलिकॉप्टरमधून आणू असे अजितदादा गटातील आमदार हसन मुश्रीप यांनी वक्तव्य केलं आहे. त्यावर आमच्या विरोधकांकडे भरपूर घबाड दिसतंय. असा टोला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे.
हेही वाचा…“मुहुर्त ठरू तर द्या..”, खडसेंच्या भाजप प्रवेशावर गिरीश महाजनांचं सुचक विधान, राजकीय वर्तुळात चर्चा
कोल्हापुर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसपुरस्कृत म्हणून शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्यावर पुन्हा महायुतीने विश्वास टाकला आहे. याच मंडलिकांच्या प्रचारासाठी हसन मुश्रीफ यांनी सभा घेतली. या सभेत बोलतांना ते म्हणाले की, आपल्या चार आमदारांना जेवढे मतदान पडलं आहे. तेवढं मतदान आता लोकसभेच्या निवडणुकीत पडलं पाहिजे. यातून लाख सव्वा लाख मताधिक्य आपल्याला मिळालं तर संजय मंडलिक यांचा पराभव करणं भगवानाला देखील शक्य नाही. यातच मतदार पुण्यात असू दे, मुंबईत असू दे. गरज पडली तर त्यांना आणण्यासाठी हेलिकॉप्टरचा उपयोग करू असे विधान मुश्रीफांनी केलं आहे.
हेही वाचा...जळगावात ठाकरे गट भाजपला खिंडार पाडणार , ३० माजी नगरसेवक फुटणार, राजकीय भुकंप अटळ
मुश्रीफांनी केलेल्या विधानानावर जंयत पाटलांनी चांगलीच टोलेबाजी केली आहे. हेलिकॉप्टरमधून मतदाराला आणणं म्हणजे मतदाराची सगळी व्यवस्था करण्याचं ठरलं आहे. त्यामुळे आमच्या विरोधकांकडे भरपुर घबाड दिसतं आहे. यातून असं दिसतंय की आमचे विरोधक किती गब्बर आहेत. अन् पैशातून किती कोटी ताकद असल्याचे दिसतंय. यातून समोरच्या बाजूने प्रंचड माया गोळा करण्यात आल्याचं महाराष्ट्रात दिसून येतंय. असा टोला जयंत पाटलांनी लगावला.
READ ALSO :
हेही वाचा…“चला भेटूया, मताधिक्य गाठूया’”, मुरलीधर मोहोळांच्या विजयासाठी महायुती मैदानात
हेही वाचा..“आधी प्रखर विरोध, आता आढळरावांच्या प्रचारासाठी मैदानात,” अजितदादांचा ‘हा’ शिलेदार लागला कामाला
हेही वाचा…“उमेदवारी मिळाली नाही तर विशाल पाटील बंडखोरी करणार का ?” विश्वजीत कदम म्हणाले..
हेही वाचा..शरद पवारांनी नाकारलं, वंचित तारणार ? बीडमध्ये ज्योती मेटे यांना वंचितकडून उमेदवारी ?
हेही वाचा…“पटोले भर सभेत एका खासदाराच्या ‘मृत्यूची कामना’ करतात? असंवेदनशीलतेचा हा कहर”, फडणीसांचं कॉंग्रेसवर टिकास्र