पुणे : राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर शिरूर लोकसभा मतदारसंघाबाबत गेले अनेक दिवसांपासून मोठा पेच निर्माण झाला होता. परंतु शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून तिकीट देण्यात आले. मात्र आढळरावांच्या उमेदवारीला अजित पवार गटाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यामध्ये भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी तर कडाडून विरोध करत आढळरावांचा प्रचार करण्यापेक्षा राजकारण सोडून देणार अशी भूमिका घेतली होती. मात्र अजितदादांच्या समजूतीनंतर आता लांडे आढळरावांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. विलास लांडे स्वत: प्रचारासाठी मैदानात उतरणार असल्याने आढळरावांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा…अन् वसंत मोरेंनी ससून रूग्णालयाला भेट दिला उंदिर पकडण्याचा पिंजरा, दिला ‘हा’ इशारा
दुसऱ्या पक्षातील नेत्यांना उमेदवारी नकोच, असे म्हणत अजितदादांच्या नेत्यांनी आढळरावांचा कडवा विरोध केला होता. मात्र अजित दादांनी सर्व नेत्यांची एकत्रित बैठक घेत स्थानिक नेत्यांची नाराजी दुर केली अन् आढळरावांचा प्रचार करण्याचा आदेश दिला. यामध्ये विलास लांडे यांची अधिक नाराजी दिसून आली. ते तर शरद पवार गटाच्या वाटेवरही असल्याचे सांगण्यात आले. मात्र अजितदादांच्या समजूतीनंतर आता लांडे शांत झाले असून आढळरावांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी स्व:त सांगितले आहे.
याचाच भाग म्हणून शुक्रवारी आढळराव पाटलांनी थेट विलास लांडे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी दोघांनीही कार्यालयात कार्यकर्त्यांबरोबर निवडणुकीचं पुढील नियोजन आखलं. त्याआधी विलास लांडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेत त्यांचे मतही जाणून घेतले. मग आढळरावांच्या प्रचारात उतरणार असल्याने त्यांनी जाहीर केले. विलास लांडे यांच्या भूमिकेनंतर आता गेल्या निवडणुकीप्रमाणेच आढळरावांना मतांची मोठी आघाडी भोसरी मतदारसंघातून मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा..“बारामतीची लढाई कौटुंबिक नाही, भावनावश होऊ नका, भविष्याचा विचार करा,” सुनेत्रा पवार
दुसऱ्या बाजूला मावळात विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना देखील अजित पवार यांच्या गटातील आमदार सुनील शेळके यांच्यासह भाजपचे बाळा भेगडे यांनी प्रखर विरोध केला होता. मात्र अजितदादांच्या आदेशानंतर सुनील शेळके यांच्यासह बाळा भेगडे यांनी मवाळ भूमिका घेत बारणेंचा प्रचार करणार असल्याचे सांगितले आहे. यादरम्यान श्रीरंग बारणे यांची अजितदादांनीही भेट घेतली होती. त्यानंतर आढळरावांनी लांडेची भेट घेतली असल्याची माहिती समोर येत आहे.
लोकसभा जाहीर झाल्यानंतर पिंपरी चिंचवडचे भाजपचे अध्यक्ष शंकर जगतापांनीही लोकसभा लढवण्याचे सुतोवाच केले होते. यात त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने शुक्रवारी बारणे आणि आढळरावांनी भेट घेऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. त्यानंतर जगतापांनी बारणेंना खासदारकीच्या हॅटट्रिकसाठी आपल्या शुभेच्छा दिल्याचे सांगितले. तसेच राजकीय व्युहरचेनवर चर्चा झाल्याचीही दावा त्यांनी केला.
READ ALSO :
हेही वाचा…“उमेदवारी मिळाली नाही तर विशाल पाटील बंडखोरी करणार का ?” विश्वजीत कदम म्हणाले..
हेही वाचा..शरद पवारांनी नाकारलं, वंचित तारणार ? बीडमध्ये ज्योती मेटे यांना वंचितकडून उमेदवारी ?
हेही वाचा…“पटोले भर सभेत एका खासदाराच्या ‘मृत्यूची कामना’ करतात? असंवेदनशीलतेचा हा कहर”, फडणीसांचं कॉंग्रेसवर टिकास्र
हेही वाचा..“मुहुर्त ठरू तर द्या..”, खडसेंच्या भाजप प्रवेशावर गिरीश महाजनांचं सुचक विधान, राजकीय वर्तुळात चर्चा
हेही वाचा...जळगावात ठाकरे गट भाजपला खिंडार पाडणार , ३० माजी नगरसेवक फुटणार, राजकीय भुकंप अटळ