सांगली : सांगलीच्या जागेसाठी कॉंग्रेसने सुरूवातीपासून आक्रमक होत जागा आपणच लढणार असा दावा ठोकला. मात्र उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभेतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्याने कॉंग्रेसचे स्थानिक नेते नाराज झालेत. यामध्ये माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी तर ठाकरेंवर उघडउघड नाराजी व्यक्त केली. अशातच आज विद्यमान खासदार संजय राऊत चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी आले असता त्यांनी त्याकडे पाठ फिरवली. अशातच सांगली लोकसभेत विशाल पाटील बंडखोरी करणार का ? त्यावर मोठं उत्तर दिलंय.
हेही वाचा..“बारामतीची लढाई कौटुंबिक नाही, भावनावश होऊ नका, भविष्याचा विचार करा,” सुनेत्रा पवार
कोल्हापुरची जागा ठाकरेंनी कॉंग्रेसला सोडली. त्यामुळे सांगलीची जागा आम्हाला आम्हाला मिळावी, अशी मागणी ठाकरे गटाने केलीय. मात्र याठिकाणी आधीच विशाल पाटील यांनी तयारी सुरू करून दिली होती. त्यामुळे ही जागा कॉंग्रेसला मिळावी अशी मागणी विश्वजीत कदम यांनी केली. यातच आता आठवड्यात विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनी पक्षश्रेष्ठींशी भेट घेतली होती. यानंतर त्यांनी मैत्रीपुर्ण लढतीचा प्रस्ताव कॉंग्रेसपुढे ठेवणार असल्याचे सांगितले.
हेही वाचा…कॉंग्रेसच्या नेत्यांनी राऊतांच्या कार्यक्रमाला फिरवली पाठ ; सांगलीच्या जागेवरून वाद आणखी वाढला
दरम्यान, कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची भावना मांडण्याचं काम करत आहे. विशाल पाटील यांनी अपक्ष लढावं की नाही हे आताच सांगणार नाही. कॉंग्रेसच्या नेत्यांचं मार्गदर्शन घेऊन निर्णय घेणार आहे. शिवसेनेने काय फॉर्म्युला दिला आहे तो आज आम्ही वरिष्ठांकडून समजून घेऊ असे कदम म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा..शरद पवारांनी नाकारलं, वंचित तारणार ? बीडमध्ये ज्योती मेटे यांना वंचितकडून उमेदवारी ?
हेही वाचा…“पटोले भर सभेत एका खासदाराच्या ‘मृत्यूची कामना’ करतात? असंवेदनशीलतेचा हा कहर”, फडणीसांचं कॉंग्रेसवर टिकास्र
हेही वाचा..“मुहुर्त ठरू तर द्या..”, खडसेंच्या भाजप प्रवेशावर गिरीश महाजनांचं सुचक विधान, राजकीय वर्तुळात चर्चा
हेही वाचा...जळगावात ठाकरे गट भाजपला खिंडार पाडणार , ३० माजी नगरसेवक फुटणार, राजकीय भुकंप अटळ
हेही वाचा…अन् वसंत मोरेंनी ससून रूग्णालयाला भेट दिला उंदिर पकडण्याचा पिंजरा, दिला ‘हा’ इशारा