ठाणे : सांगलीसह आता भिवंडीच्या जागेवरूनही कॉंग्रेसने मित्र पक्षांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यास सूरुवात केली आहे. भिंवडी लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाने बाळ्या मामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भिवंडीतील स्थानिक नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत उमेदवार बदलण्याची मागणी केली आहे. यातच भिवंडीची जागा मिळाली नाही तर कॉंग्रेस पदाधिकारी राजीनामा देतील. अशा इशाराच महेंद्र थोरवे यांनी दिला आहे. त्यामुळे ऐननिवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत पेच वाढतच चालला आहे.
हेही वाचा…“चला भेटूया, मताधिक्य गाठूया’”, मुरलीधर मोहोळांच्या विजयासाठी महायुती मैदानात
भिवंडी मतदारसंघ हा कॉंग्रेस ठणकावून सांगितलं आहे. जर ही जागा मिळाली नाही तर कॉंग्रेसचे सगळे नेते राजीनामा देतील. याची सुरूवात भिवंडीपासून होईल. असे महेंद्र थोरवे यांनी सांगितलं आहे. तर दयानंद चोरघेंनी अर्ज भरावा, असा ठराव देखील यावेळी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मंजूर झाला आहे. त्यामुळे याठिकाणी आता पुढील काही दिवसात काय राजकीय घडामोडी घडणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…“आधी प्रखर विरोध, आता आढळरावांच्या प्रचारासाठी मैदानात,” अजितदादांचा ‘हा’ शिलेदार लागला कामाला
दरम्यान, भिवंडीत लोकसभेतून महायुतीकडून कपिल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून शरद पवार गटातील बाळ्या मामा म्हात्रे यांना संधी देण्यात आलीय. मात्र या जागेसाठी कॉंग्रेस आग्रही असून त्यांनी आता आक्रमक भूमिका घेण्यास सुरूवात केली आहे. तर दुसऱ्या बाजूला सांगलीत देखील हेच चित्र असून कॉंग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी तर थेट इशाराच दिलाय.
READ ALSO :
हेही वाचा…प्रणिती शिंदेंनी सोडवला पाणी वाटपाचा प्रश्न ; आचारसंहितेमधून मिळणार मुभा
हेही वाचा..“बाळासाहेबांच्या रिमोट कंट्रोलने चालणाऱ्या कमळाबाईंच्या रिमोट कंट्रोलने आता शिंदेंची शिवसेना चालते”
हेही वाचा…विजय शिवतारेंची मागणी, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सासवडमध्ये सुनेत्रा पवारांसाठी जाहीर सभा
हेही वाचा…“सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार”, आघाडीत पेच वाढला, विशाल पाटलांनी जाहीर केली आपली भूमिका
हेही वाचा…““निवडणुकीसाठी समोर प्रचंड माया गोळी गेलीय,”मुश्रीफांच्या हेलिकॉप्टरच्या विधानाचा जयंत पाटलांनी घेतला समाचार