रायगड : राज्यात झालेल्या पक्ष फुटीनंतर रायगड लोकसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल लागणार असल्याची चर्चा आता मतदारसंघात सुरू झाली आहे. अजित पवार गटाकडून विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना आपली उमेदवारी जाहीर केलीय. तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाकडून माजी खासदार अनंत गिते यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे या लढतीकडे आता सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. यातच मतदारसंघातील राजकीय गणित पाहिलीत तर याठिकाणी तटकरे यांची बाजू उजवी ठरतांना दिसत आहे.
हेही वाचा…विजय शिवतारेंची मागणी, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सासवडमध्ये सुनेत्रा पवारांसाठी जाहीर सभा
रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघापैकी तीन आमदार शिंदे गटात तर भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, आणि ठाकरे गटाकडे प्रत्येकी एक आमदार आहेत. रायगडमध्ये पेनचे आदमार रवीशेठ पाटील हे भाजपकडे आहे. तर अलिबागमधून महेंद्र दळवी हे शिंदे गटात आहेत. श्रीवर्धनमधून अदिती तटकरे या राष्ट्रवादी अजित पवार गटात सामील आहेत. तर महाडमध्ये भरतशेठ गोगावले आणि दापोलीतून योगेश कदम यांनी शिंदेंना पाठिंबा दिलाय. तर गुहागरमध्ये एकमेव आमदार भास्कर जाधव ठाकरे गटात आहेत.
हेही वाचा…“सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार”, आघाडीत पेच वाढला, विशाल पाटलांनी जाहीर केली आपली भूमिका
वरील राजकीय गणितं पाहिलीत तर महायुतीकडे पाच आमदार असून महाविकास आघाडीकडे फक्त एकच आमदार आहे. त्यामुळे याठिकाणी अनंत गिते यांना पुन्हा पराभवाचा सामना करावा लागणार अशी शक्यता आहे. 2019 च्या निवडणुकीत तटकरे यांना 486,968 मिळाली होती. आता तटकरे यांनी अवघ्या ३१ हजारांनी विजय मिळवला होता. मात्र आता दोन्ही पक्षात झालेली फुट यावेळी तटकरे यांना फायद्याची ठरणार अशी चर्चा सुरू आहे.
दरम्यान, दुसऱ्या बाजूला शिंदे गटात असलेले भरतशेठ गोगावले मागील काही महिन्यांपासून नाराज असल्याचे दिसून आलेत. मंत्रीपद त्यानंतर पालकमंत्रीपदासाठी ते आडून बसले होते. मात्र देशात पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे असल्याने भाजपचे वरीष्ठ नेते याठिकाणी भरत शेठ गोगावले यांना तटकरेंना पाठिंबा देण्याचे आदेश देतील. त्यामुळे नाराजी दुर करून गोगावले देखील तटकरेंसाठी मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…काल फडणवीसांसोबत चर्चा, आज उमेदवारी रद्द, वंचितने बांदल यांची केली उमेदवारी रद्द
हेही वाचा…घराणेशाहीची ऐशीतैशी..! विदर्भातील १० पैकी ०४ उमेदवार घराणेशाहीतील
हेही वाचा…“जागा मिळाली नाही तर कॉंग्रेसचे सगळे नेते राजीनामा देणार”, आघाडीत ‘या’ जागेवरून कॉंग्रेसची आक्रमक भूमिका
हेही वाचा…प्रणिती शिंदेंनी सोडवला पाणी वाटपाचा प्रश्न ; आचारसंहितेमधून मिळणार मुभा
हेही वाचा..“बाळासाहेबांच्या रिमोट कंट्रोलने चालणाऱ्या कमळाबाईंच्या रिमोट कंट्रोलने आता शिंदेंची शिवसेना चालते”