पुणे : लोकसभा निवडणुकीपुर्वी विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटातील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण माने आज अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. यातच शरद पवार गटातील सोनाई ग्रुपचे संचालक दशरथ माने देखील अजित पवार गटात जाणार आहेत. दोन दिवसाआधी प्रवीण माने यांनी इंदापुरात माने यांची भेट घेतली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळाच याची एकच चर्चा झाली. त्यानंतर आज त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का मानला जात आहे.
हेही वाचा…“तटकरे पुन्हा ‘रायगडचा किल्ला’ भेदून खासदार होणार ?” रायगड लोकसभेची राजकीय गणितं काय ?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे हात बळकट करून दादांची ताकद वाढवण्यासाठी माने परिवाराने अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रवीण माने यांनी सांगितले आहे. तर प्रवीण माने हा माझाच कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्ष प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही मुळ राष्ट्रवादी पक्षातच आहोत. निवडणुक आयोगाने देखील मुळ राष्ट्रवादी आणि चिन्हांबाबतही क्लिअर निर्णय दिला आहे. त्यामुळे सगळेच कार्यकर्ते आम्ही मिळून मिसळूनच काम करत आलो असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलीय.
हेही वाचा…काल फडणवीसांसोबत चर्चा, आज उमेदवारी रद्द, वंचितने बांदल यांची केली उमेदवारी रद्द
यावेळी दशरथ माने म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. या देशातील असंख्य गोष्टी योग्य रितीने घेऊन जाऊन एक स्वतची कल्पकता दाखवणं खुप मोठं आहे. कश्मीरमध्ये ३७० कलम रद्द करणं. सोप्पी गोष्ट नाही. या भागात गेल्या काही वर्षी ६५ हजार निपराध नागरिक याठिकाणी मारले गेले आहेत. आपल्या कुटुंबातले गेले नाहीत. त्यामुळे आपल्याला तितकं दुख नाही. ज्यांच्या कुटुंबातली व्यक्ती केवळ काश्मीरमध्ये राहून मरण पावली. त्यांच्या भोवती कसं वातावरण असेल याची आपण कल्पना करून शकत नाही. नरेंद्र मोदी नसते तर शेजारचं पाकिस्तान काश्मीरवर कब्जा करून देशाचं नकाशा बदलू शकला असता असेही प्रवीण माने यांनी म्हटले.
दरम्यान, गेल्या अनेक लोकसभा निवडणुकांमध्ये प्रवीण माने यांनी सुप्रिया सुळे यांचं काम केलं आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांचं काम देखील प्रवीण माने करत होते. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर प्रवीण माने यांनी सुप्रिया सुळे यांची साथ सोडल्याने त्यांना हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“अडीच लाख घरं, दहा लाख मतदार आणि दहा हजार कार्यकर्ते”, पुणे लोकसभा जिंकण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी सांगितली व्युहरचना
हेही वाचा…महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळांनी साधला, झैनी मशिदीत बोहरी बांधवांशी संवाद
हेही वाचा…“फडणवीसांचा खडसेंना विरोध नाही, ते आले तर स्वागतच”, खडसेंचा भाजप पक्ष प्रवेश ठरला
हेही वाचा…“भिवंडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटविरुद्ध काँग्रेस वाद भडकला”, कॉंग्रेसने दिला हा इशारा
हेही वाचा…एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश निश्चित, परंतु रोहिणी खडसेंच्या राजकीय भवितव्यावर घोडे अडले ?