पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात सध्या सुनेत्रा पवार यांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. भाजपचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांची काल सुनेत्रा पवार यांनी भेट घेऊन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. यातच त्यांनी रविवारी सुनेत्रा पवार खडकवासला मतदारसंघात येणाऱ्या तळजाई टेकडी या परिसरामध्ये प्रचारासाठी पोचल्या होत्या. याच दरम्यान महाविकास आघाडीचे पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची भेट झाली. त्यावेळी त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा…“भिवंडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटविरुद्ध काँग्रेस वाद भडकला”, कॉंग्रेसने दिला हा इशारा
आज सकाळी सकाळी तळजाई टेकडी येथील तळजाई देवीच्या दर्शनाने सुनेत्रा पवार यांनी प्रचाराला सुरूवात केली. यावेळी त्या म्हणाल्या की, सदृढ आरोग्याची साधना करणारे अक्षरशः हजारो अबालवृद्ध मला याठिकाणी भेटले. गर्द वनराईने बहरलेल्या आणि पुण्याचे ऑक्सिजन सेंटर असणाऱ्या या टेकडीवर व्यायामासाठी पुणेकर गर्दी करतात. या टेकडी परिसराच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भरघोस निधी उपलब्ध करून देतानाच स्थानिक नेते, पदाधिकारी यांनी या परिसराच्या विकास संवर्धनासाठी जागरुकता दाखवली. त्याचे परिणाम इथे सहजपणे दिसून येत होते. निवडणुकीच्या निमित्ताने येथे भेटलेल्या हजारो नागरिकांशी संवाद साधला.
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, अनंत ढेरे काकांनी भेट दिलेल्या सोनचाफ्याच्या फुलांनी तळजाई टेकडीची भेट सुगंधी केली. अफाट उत्साहाने फुलून गेलेल्या तळजाई टेकडीवरील हजारो नागरिकांची ही भेट विशेष ऊर्जादायी ठरली. आमदार भीमरावअण्णा तापकीर यांनी नागरिकांशी संवाद साधताना खडकवासला मतदार संघातून एक लाखाहून अधिक मताधिक्य देणार असल्याची ग्वाही देत आपले मनोगत व्यक्त केले. ते सर्वांनाच दिशादर्शक होते. असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा…एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश निश्चित, परंतु रोहिणी खडसेंच्या राजकीय भवितव्यावर घोडे अडले ?
सुनेत्रा पवार म्हणाल्या की, सुसंस्कृत पुण्याची परंपरा, तळजाई टेकडीवर उजळली. काही व्यक्तींची ओळख सर्वव्यापी असते. अशा व्यक्ती कुठल्याच एखाद्या चौकटीत मर्यादित राहू शकत नाहीत. अशापैकीच एक असणारे वक्ते, लेखक, कला – साहित्य क्षेत्रात प्रचंड मुशाफिरी करत अनेक सारस्वतांच्या मांदियाळीत नेहमी शोभून दिसणारे बहुआयामी, अष्टावधानी, सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार. उल्हासदादांची भेट आज सकाळी पुण्यातील तुळजाई टेकडी येथे झाली.
यावेळी दादांना नमस्कार केला. या ठिकाणी नेहमी फिरायला येतो, असे सांगून उल्हासदादांनी आपुलकीने केलेली चौकशी, विचारपूस जिव्हाळा दर्शवणारी होती. तो जिव्हाळा सर्व चौकटी पलीकडचा होता. विशेष भावणारा होता. याच ठिकाणी आमदार रवी धंगेकर यांचीही भेट झाली. आम्ही परस्परांना नमस्कार केला. यावेळी माझ्यासोबत असणाऱ्या आमदार भीमरावअण्णा तापकीर, दत्ता धनकवडे, आप्पा रेणूसे यांच्यासह महायुतीच्या सर्वच नेते पदाधिकाऱ्यांशी त्यांनी खेळीमेळीने संवाद साधला. असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, रविवारी सकाळी पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे देखील प्रचारासाठी तळजाई टेकडीवर आले. याच दरम्यान सुनेत्रा पवार यांच्याशी त्यांची भेट झाली. यावेळी दोन्ही उमेदवारांनी चर्चा करत एकमेकांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी एकमेकांशी संवाद साधला. दोन्ही नेत्यांसोबत अनेकांनी तळजाई टेकडीवर फोटोही काढले.
READ ALSO :
हेही वाचा…“महायुतीचा धर्म पाळणार, तटकरेंना ऐतिहासिक मतांनी संसदेत पाठवणार”, रायगडमध्ये निर्धार मेळावा
हेही वाचा…बारामतीत सुप्रिया सुळे यांना सर्वात मोठा धक्का, प्रवीण माने, दशरथ मानेंचा अजित पवारांना पाठिंबा
हेही वाचा…“अडीच लाख घरं, दहा लाख मतदार आणि दहा हजार कार्यकर्ते”, पुणे लोकसभा जिंकण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी सांगितली व्युहरचना
हेही वाचा…महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळांनी साधला, झैनी मशिदीत बोहरी बांधवांशी संवाद
हेही वाचा…“फडणवीसांचा खडसेंना विरोध नाही, ते आले तर स्वागतच”, खडसेंचा भाजप पक्ष प्रवेश ठरला