नाशिक : नाशिक लोकसभेसाठी महायुतीत चांगलीच रस्सीखेच सुरू झालीय. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात नाशिकची जागा आम्हाला मिळावी, असा आग्रह अजितदादांच्या राष्ट्रवादीने धरला आहे. ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. मात्र नाशिकच्या जागेसाठी महायुतीचा उमेदवार अद्यापही ठरलेला नाहीय. अशातच आज प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नाशिक लोकसभेसाठी मंत्री छगन भुजबळ यांची उमेदवारी जाहीर करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…बारामतीत सुप्रिया सुळे यांना सर्वात मोठा धक्का, प्रवीण माने, दशरथ मानेंचा अजित पवारांना पाठिंबा
आज राष्ट्रवादी अजित पवार गटाची पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यात अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे छगन भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेमुळे नाशिकची उमेदवारी जाहीर करण्यास उशीर होत असल्याचे सुत्रांकडून समजत आहे. त्यामुळे आजच सुनील तटकरे भुजबळांची उमेदवारी जाहीर करणार असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा…“अडीच लाख घरं, दहा लाख मतदार आणि दहा हजार कार्यकर्ते”, पुणे लोकसभा जिंकण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी सांगितली व्युहरचना
दरम्यान, नाशिकसह इतर लोकसभा मतदारसंघाबाबत महायुतीच्या नेत्यांची अलिकडेच चर्चा झाली आहे. यामध्ये नाशिकची जागा ही अजित पवार गटाला साताऱ्याच्या बदल्यात मिळणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे नाशिकची जागा भुजबळांना मिळाल्यास राजा भाऊ वाजे विरूद्ध छगन भुजबळ असा सामना नाशकात बघायला मिळण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“राजेंद्र राऊतांचा मला भावासारखा पाठिंबा मिळणार, अन् माझाच विजय होणार”, अर्चना पाटलांचा विश्वास
हेही वाचा…“सध्याच्या राजकीय परिस्थितीत देवेंद्र फडणवीसांना विनोद तावडेंनी चिटपट केलेय”
हेही वाचा…“आढळराव पाटील हा काम करणारा माणूस, जुन्नरमधून शिवाजी दादांना सर्वाधिक मते पडणार “, आमदार अतुल बेनके
हेही वाचा…“सुसंस्कृत पुण्याची परंपरा, तळजाई टेकडीवर उजळली”, सुनेत्रा पवार अन् धंगेकरांमध्ये रंगल्या राजकीय गप्पा
हेही वाचा…“महायुतीचा धर्म पाळणार, तटकरेंना ऐतिहासिक मतांनी संसदेत पाठवणार”, रायगडमध्ये निर्धार मेळावा