पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. जागावाटपावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच बघायला मिळत आहेत. तर काही ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उमेदवार बदलले जात आहेत. यातच राष्ट्रवादी शरद पवार गटात असलेले आमदार एकनाथ खडसे भाजपच्या वाट्यावर असल्याची माहिती समोर येत आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
हेही वाचा…महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळांनी साधला, झैनी मशिदीत बोहरी बांधवांशी संवाद
सुषमा अंधारे म्हणाल्या की, पंकजा मुंडे , महादेव जानकर यांना उमेदवारी दिली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला जळगावचा उमेदवार बदलण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. यातच एकनाथ खडसे यांची पुन्हा अमित शहा यांच्याशी भेट घेतली आहे. फडणवीसांना 2-2 दिवस वेटिंग आणि नवनीत राणा यांना एक तासाच्या आत भेट दिली जात आहे. या सगळ्यांचा अर्थ असा आहे की, फडणवीसांना विनोद तावडे यांनी चिटपट केलेय. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
हेही वाचा…“फडणवीसांचा खडसेंना विरोध नाही, ते आले तर स्वागतच”, खडसेंचा भाजप पक्ष प्रवेश ठरला
दरम्यान, बीडमध्ये विद्यमान खासदार प्रितम मुंडे यांचं तिकीट कापून त्याठिकाणी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर माढ्यातून शरद पवार गटाकडून इच्छूक असलेले महादेव जानकर यांनी अजितदादांच्या पाठिंब्यावर परभणीतून लोकसभेसाठी अर्ज दाखल केलाय. यातच जळगाव लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना नाकारल्यानंतर त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय. त्यांच्या जागी स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आलीय.
दुसऱ्या बाजूला एकनाथ खडसे पुन्हा भाजपवासी होणार असल्याची चर्चा आहे. त्यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांच्यासह जे.पी.नड्डा यांची देखील भेट घेतलीय. तर मागच्या लोकसभेला तिकीट नाकारलेले विनोद तावडे यांनी स्वत: नरेंद्र मोदी यांची उमेदवारी जाहीर केलीय. विनोद तावडे यांचे नाव सातत्याने देशाच्या राजकारणात चर्चेत येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
पंकजा मुंडे , महादेव जानकर यांना उमेदवारी जळगाव चा उमेदवार बदलण्याची तयारी, श्री एकनाथ खडसे यांची पुन्हा अमित शहा यांच्याशी भेट, फडणविसाना 2-2दिवस वेटिंग आणि नवनीत राणा यांना एक तासाच्या आत भेट या सगळ्यांचा अर्थ..
फडणवीसांना विनोद तावडे यांनी चिटपट केलेय..! #आताकधीचयेणारनाही pic.twitter.com/znekHdKydV— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) April 6, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“आढळराव पाटील हा काम करणारा माणूस, जुन्नरमधून शिवाजी दादांना सर्वाधिक मते पडणार “, आमदार अतुल बेनके
हेही वाचा…“सुसंस्कृत पुण्याची परंपरा, तळजाई टेकडीवर उजळली”, सुनेत्रा पवार अन् धंगेकरांमध्ये रंगल्या राजकीय गप्पा
हेही वाचा…“महायुतीचा धर्म पाळणार, तटकरेंना ऐतिहासिक मतांनी संसदेत पाठवणार”, रायगडमध्ये निर्धार मेळावा
हेही वाचा…बारामतीत सुप्रिया सुळे यांना सर्वात मोठा धक्का, प्रवीण माने, दशरथ मानेंचा अजित पवारांना पाठिंबा
हेही वाचा…“अडीच लाख घरं, दहा लाख मतदार आणि दहा हजार कार्यकर्ते”, पुणे लोकसभा जिंकण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी सांगितली व्युहरचना