नागपुर : अमरावती लोकसभा मतदारसंघात विरोध असतानाही भाजपने विद्यमान खासदार नवनीत राणा यांना तिकीट दिल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी महायुतीवर जोरदार प्रहार केला आहे. नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवार दिला आहेच परंतु दुसऱ्या बाजूला रामटेक आणि अकोल्यात कॉंग्रेसला पाठिंबा दिल्याने बच्चू कडू यांचा दबाव झिडगावून लावत भाजपसोबत जुळवून न घेण्याचे संकेत बच्चू कडू यांनी दिले आहेत.
हेही वाचा…“आढळराव पाटील हा काम करणारा माणूस, जुन्नरमधून शिवाजी दादांना सर्वाधिक मते पडणार “, आमदार अतुल बेनके
नवनीत राणा यांना प्रखर विरोध असतांना भाजपने त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर नवनीत राणा यांच्या विरोधात बच्चू कडू यांनी दिनेश बुब यांना उमेदवारी देत राणा यांच्यासह भाजपलाही चॅलेंज केले. यानंतर आता बच्चू कडू यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना आपला पाठिंबा जाहीर करत मोठं आवाहन उभं केलं आहे. याठिकाणी महायुतीकडून कॉंग्रेसमधून शिवसेनेत आलेले राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आलीय.
दुसऱ्या बाजूला अकोल्यात बच्चू कडू यांनी कॉंग्रेसचे डॉ. अभय पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत असून महायुतीकडून अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिली आहे. तर वंचितकडून स्वत: प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. अशातच बच्चू कडू यांनी घेतलेल्या निर्णयामुळे महायुती तसेच भाजपची चांगलीच गोची झाल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा…“सुसंस्कृत पुण्याची परंपरा, तळजाई टेकडीवर उजळली”, सुनेत्रा पवार अन् धंगेकरांमध्ये रंगल्या राजकीय गप्पा
दरम्यान, अमरावतीमधून भाजपकडून लढत असलेल्या नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले आहे. रामटेकमधून कॉंग्रेसची उमेदवारी मिळालेल्या रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला. राणा दाम्पत्याने बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनाच भाजपने उमेदवारी दिल. हा प्रकार प्रहारच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावण्याचा आहे. तर रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र शासकीय यंत्रणेचा दुरूपयोग करून रद्द करण्यात आला आहे. हा मागासवर्गीय महिलेवर अन्याय आहे. त्यामुळे नागपुर जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत रामटेकमध्ये महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
READ ALSO :
हेही वाचा…““माझा पक्ष प्रवेश चंद्रपुरच्या सभेत नाही तर दिल्लीत होणार”, एकनाथ खडसे यांचं मोठं विधान, शरद पवारांना मोठा धक्का
हेही वाचा…“संकल्पबद्ध होण्याची हीच ती वेळ”, आपली लेक म्हणून सर्वांनी मला पाठिंबा द्यावा “,अर्चना पाटलाचं मतदारांना आवाहन
हेही वाचा…नाशिकच्या जागेचा तिढा आज सुटणार? भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
हेही वाचा…“राजेंद्र राऊतांचा मला भावासारखा पाठिंबा मिळणार, अन् माझाच विजय होणार”, अर्चना पाटलांचा विश्वास
हेही वाचा…“सध्याच्या राजकीय परिस्थितीत देवेंद्र फडणवीसांना विनोद तावडेंनी चिटपट केलेय”