रायगड : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार गटाकडून सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टिका केली जात आहे. अशातच सुनील तटकरे यांनीच शरद पवारांचं घर फोडल्याचा पुन्हा उल्लेख आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आव्हाडांचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे.
हेही वाचा…‘तळपत्या उन्हातील जनप्रेमाची शीतल झुळूक’, सुनेत्रा पवारांना लोकांचा वाढता प्रतिसाद
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यावर केलेल्या आरोपांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. ते म्हणाले की, आमच्यावर आव्हाड यांनी आरोप करण्यापेक्षा २०१४ साली विधानसभेचे निकाल लागण्यापूर्वी भाजपाला बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका का घेतली ? २०१६ मध्ये भाजपाच्या शीर्ष नेतृत्वासोबत कोणती चर्चा करण्यात आली असे अनेक प्रश्न शरद पवार साहेबांना विचारावे, असे परांजपे म्हणाले.
हेही वाचा…“उत्तराला अर्धवट तोडून माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला”, ‘त्या’ वक्तव्यावरून अर्चना पाटलांकडून स्पष्टीकरण
पुढे बोलतांना ते म्हणाले की, १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून अजितदादांचे पक्षासाठी दिलेले अखंड योगदान, सुनिल तटकरे यांचे असणारे योगदान, त्यावेळी पहिले प्रांताध्यक्ष म्हणून छगन भुजबळ यांनी दिलेले योगदान पाहिले तर जितेंद्र आव्हाड यांची योगदान विचारायची पात्रताच नाही, असा शब्दात आनंद परांजपे यांनी आव्हाडांना फटकारले.
दरम्यान, आमच्या नेत्यांना नावं ठेवण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील सूर्याजी पिसाळ, खंडू खोपडे जर कोण असेल तर ते स्वतः जितेंद्र आव्हाड आहेत. महाविकासाच आघाडीची भिवंडीची सीट म्हणजेच बाळ्यामामा यांना निवडून आणण्यासाठी आव्हाडांनी प्रामाणिक प्रयत्न करावे, ती सीट निवडून आणावी, असे थेट आव्हान परांपजे यांनी दिले.
READ ALSO :
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीत उमेदवारीचं काही दडपण आहे का ? सुनेत्रा पवारांनी दिले ‘हे’ उत्तर
हेही वाचा…“अशा गद्दारांना मनसे म्हणून आम्ही अजिबात सहकार्य करणार नाही”, कल्याणमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराला मनसेचा विरोध
हेही वाचा…“कुणी पैसे वाटले तर घ्या, मात्र मत महाविकास आघाडीलाच करा,” मावळाच्या उमेदवाराचा अजब गजब मतदारांना सल्ला
हेही वाचा…शरद पवार गटाकडून ‘रावेर’साठी सक्षम उमेदवार शोध संपला, ‘या’ बड्या नेत्याला उमेदवारी जाहीर