जळगाव : लोकसभा निवडणुकीत चर्चेत आलेल्या रावेर लोकसभेसाठी शरद पवार गटाचा उमेदवार अखेर निश्चित झाला आहे. महायुतीकडून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्यानंतर महाविकास आघाडीकडून कुणाला उमेदवारी देण्यात येईल याची उत्सुकता लागून राहिली होती. अशातच महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी माघार घेतल्यानंतर याठिकाणी सक्षम उमेदवारांचा शोध सुरू होता. तो अखेर सुटला असून आज सांयकाळी उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“संकल्पबद्ध होण्याची हीच ती वेळ”, आपली लेक म्हणून सर्वांनी मला पाठिंबा द्यावा “,अर्चना पाटलाचं मतदारांना आवाहन
रावेर लोकसभा मतदारसंघात सक्षम उमेदवाराच्या शोधात राष्ट्रवादी शरद पवार गट गेल्या काही दिवसापासून होता. यातच आता रावेर लोकसभा मतदारसंघातून अॅड. रवींद्र भैय्या पाटील यांची रावेर लोकसभा मतदारसंघात वर्णी लागली आहे. या संदर्भात अधिकृत घोषणा आज सायंकाळी शरद पवार गटाकडून केली जाणार आहे. अॅड रवींद्र भैय्या पाटील हे शरद पवार गटाचे जिल्ह्याध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर आता रक्षा खडसे यांचं मोठं आवाहन असणार आहे.
हेही वाचा…नाशिकच्या जागेचा तिढा आज सुटणार? भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
गेल्या अनेक वर्षांपासून रावेर लोकसभा मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व राहिलं आहे. यातच हा मतदारसंघ एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांचा असल्याचं म्हटलं तरी वावगं ठरणार आहे. अशातच आता खडसे पुन्हा भाजपमध्ये जात असल्याने याठिकाणी भाजपची ताकद आणखीच वाढली आहे. मात्र रोहिणी खडसे यांनी अद्यापही भाजपमध्ये न जाण्याचा निर्णय घेतल्याने याठिकाणी चांगलीच चुरस बघायला मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, रावेर लोकसभेसह शरद पवार गटाकडून आज माढा आणि सातारा लोकसभेसाठी उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे किंवा पृथ्वीराज चव्हाण तर माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील, अनिकेत पाटील आणि अभय पाटील यांच्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…‘तळपत्या उन्हातील जनप्रेमाची शीतल झुळूक’, सुनेत्रा पवारांना लोकांचा वाढता प्रतिसाद
हेही वाचा…“उत्तराला अर्धवट तोडून माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला”, ‘त्या’ वक्तव्यावरून अर्चना पाटलांकडून स्पष्टीकरण
हेही वाचा…दहा लाख मतदारांपर्यंत पोहोचला ‘मोदींचा नमस्कार’, ‘हर घर मोदी परिवार’ अभियानात भाजपच्या दहा हजार कार्यकर्त्यांचा सहभाग
हेही वाचा…बच्चू कडूंनी भाजपचा दबाव झुगारला, अकोल्यासह रामटेकमध्ये महायुतीवर बच्चू कडूंचा प्रहार
हेही वाचा…““माझा पक्ष प्रवेश चंद्रपुरच्या सभेत नाही तर दिल्लीत होणार”, एकनाथ खडसे यांचं मोठं विधान, शरद पवारांना मोठा धक्का