मुंबई : राज्यात गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर महाविकास आघाडीने जागावाटपाचा तिढा सुटला असून सर्व जागा जाहीर करण्यात आल्या. सांगलीसह भिवंडी या जागेवरून वाद सुरू होता. त्यावर आता सांगलीची जागा ठाकरे गटाला तर भिवंडीची जागा ही शरद पवार गटाला सुटली आहे. यामध्ये ठाकरे गटाला सर्वात जास्त २१ जागा, त्यानंतर कॉंग्रेसला एकूण १७ तर शरद पवार गटाला एकूण १० जागा देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा…“अमोल कोल्हेंसाठी जीवाचं रान केलं, मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी..,” दिलीप मोहिते पाटलांचा कोल्हेंवर घणाघात
कॉंग्रेसच्या वाट्याला नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपुर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपुर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, सोलापुर, कोल्हापुर, रामटेक, उत्तर मुंबईची जागा देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीला बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण, बीड या जागा देण्यात आल्या आहेत. तर ठाकरे गटाला जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशीव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य या जागा मिळाल्या आहेत.
हेही वाचा…“कॉंग्रेसच्या उमेदवाराची भाजपला भीती “, मोदींची चंद्रपुरात सभा, प्रतिभा धानोरकरांचा टोला
दरम्यान, राष्ट्रवादीकडून शरद पवार, तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, तर कॉंग्रेसकडून नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात इत्यादी नेते उपस्थितीत होते. यावेळी तानाशाही प्रवृत्तीच्या विरोधात इंडिया आघाडीतील तसेच राज्यातील महाविकास आघाडी आहे. जागावाटपाचा तिढा संपुर्ष्टात आणला आहे. भाजप तसेच नरेंद्र मोदींचं सरकार सत्तेतून बाहेर काढण्याचं ठरवलं आहे. राज्यातील भ्रष्ट्चारी सरकार असून त्याला बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. असे नाना पटोले म्हणाले.
सांगली असो किंवा भिवंडी असो आमचे कॉंग्रेसचे सर्व कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना जिंकून आणण्यासाठी एकजूटाने काम करतील. लोकांनी निवडणुक हातात घेतली आहे. चंद्रपुरात पैसे देऊन लोक आणली होती. मोदींचं भाषण सुरू झाल्यानंतर लोक उठून गेलेत. मोदींना मागच्या भाषणाचीच स्क्रिप्ट वाचून दाखवली. बेरोजगारी, महागाई यावर एकही शब्द मोदींनी काढला नाही. भाजपचं काम आता काम संपलं आहे. मोदींच्या नावाचा वापर करून उमेदवार मत मागतात असेही टोला त्यांनी लगावला.
READ ALSO :
हेही वाचा…“हरण्याच्या भीतीने मुनगंटीवारांचा तोल ढळला “, चंद्रपुरच्या सभेत विखारी भाषा
हेही वाचा…“कोकणचा कॅलिफोर्निया हे स्वप्न सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही”, तटकरेंनी मतदारांना दिला शब्द
हेही वाचा…“जानकरांना शिट्टी तर वंचितच्या उमेदवाराला प्रेशर कुकर चिन्ह”, अकोल्यात तिरंगी लढत अटळ
हेही वाचा…“आतापर्यंत अजितदादांशी माझी दुश्मनी पाहिली, आता दोस्ती पाहा,” शिवतारे अन् सुनेत्रा पवारांची भेट चर्चेत
हेही वाचा…“अनंत गितेंवर तटकरेंचा जोरदार प्रहार,” तटकरेंनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला