चंद्रपुर : येत्या १९ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान होणार आहे. त्याआधी दोन्ही बाजूंच्या उमेदवारांनी आपल्या प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे. यातच महायुतीचे उमेदवार मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल चंद्रपुरात सभा घेतली. मात्र या सभेत बोलतांना सुधीर मुनगंटीवार यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीचा उल्लेख करत त्यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला. यावरून आता कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी मुनगंटीवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा…“कॉंग्रेसच्या उमेदवाराची भाजपला भीती “, मोदींची चंद्रपुरात सभा, प्रतिभा धानोरकरांचा टोला
सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये असे म्हटलंय की, निवडणूक आयोगाने तात्काळ सुधीर मुनगंटीवार यांच्या या भाषणाची दखल घेऊन कारवाई केली पाहिजे. अशा तऱ्हेची विखारी भाषा खपवून घेतली जाऊ नये. “एका भावाला बहिणीबरोबर ” सारखे भयंकर व बेफाम आरोप मुनगंटीवार यांनी केले. हरण्याच्या भीतीने तोल ढळला आहे. असा टोलाही त्यांनी मुनगंटीवार यांना लगावला.
हेही वाचा…“सुनील तटकरेंवर टिका, अजित पवार गटाने आव्हाडांना जोरदार फटकारले,” म्हणाले…
तसेच पुढे बोलतांना ते म्हणाले की, नुकतेच “आप”च्या मंत्री आतिशी यांनी भाजपाने त्यांना पक्षात प्रवेश करावा अशी ऑफर दिली असा आरोप केला, तेव्हा निवडणूक आयोगाने आतिशींना नोटीस पाठवली. जगनमोहन रेड्डी यांना तसेच सुप्रिया श्रीनेट यांना नोटीस पाठवली. निवडणुक आयोगाने आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन सहन केले जाणार नाही असे म्हटले आहे. या विधानांवर निवडणूक आयोगाच्या मतानुसार कारवाई करतील ही अपेक्षा. मुनगंटीवार यांच्या या भाषेला आणि खोट्या आरोपांना त्याच भाषेत उत्तर देऊ शकतो. आम्हाला केवळ सत्य सांगावे लागेल. असेही त्यांनी सांगितलं आहे.
निवडणूक आयोगाने तात्काळ सुधीर मुनगंटीवार यांच्या या भाषणाची दखल घेऊन कारवाई केली पाहिजे. अशा तऱ्हेची विखारी भाषा खपवून घेतली जाऊ नये. “एका भावाला बहिणीबरोबर ” सारखे भयंकर व बेफाम आरोप मुनगंटीवार यांनी केले. हरण्याच्या भीतीने तोल ढळला आहे.
नुकतेच “आप”च्या मंत्री आतिशी यांनी… pic.twitter.com/orr8dw6yYl— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 8, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“कोकणचा कॅलिफोर्निया हे स्वप्न सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही”, तटकरेंनी मतदारांना दिला शब्द
हेही वाचा…“जानकरांना शिट्टी तर वंचितच्या उमेदवाराला प्रेशर कुकर चिन्ह”, अकोल्यात तिरंगी लढत अटळ
हेही वाचा…“आतापर्यंत अजितदादांशी माझी दुश्मनी पाहिली, आता दोस्ती पाहा,” शिवतारे अन् सुनेत्रा पवारांची भेट चर्चेत
हेही वाचा…“अनंत गितेंवर तटकरेंचा जोरदार प्रहार,” तटकरेंनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला
हेही वाचा…“अमोल कोल्हेंसाठी जीवाचं रान केलं, मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी..,” दिलीप मोहिते पाटलांचा कोल्हेंवर घणाघात