सोलापुर : सोलापुर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांची ताकद आणखी वाढण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत परंपरागत विरोधक असलेल्या नेत्याने थेट प्रणिती शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय. सोलापुरमध्ये महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्यासोबत प्रणिती शिंदे यांची लढत होणार आहे. त्याआधी माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर केलाय. आडम हे प्रणिती शिंदे यांचे कट्टर विरोधक होते. त्यामुळे पाठिंबा जाहीर केल्यानंतर आता कॉंग्रेसची ताकद आणखीच वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“मोदींमुळेच निवडून आलो म्हणायचं,अन् पुन्हा त्यांनीच..,” राजेंद्र राऊतांनी निंबाळकरांचा घेतला चांगलाच समाचार
गेल्या १० वर्षात याला योग्य गती नाही, विकासाची योग्य दृष्टी नाही. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. असे म्हणत आडम यांनी राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीला तर राज्यात महाविकास आघाडीला माकपने पाठिंबा जाहीर केला. त्याआधी नरसय्या आडम यांनी कार्यालयात जाऊन प्रणिती शिंदे यांची भेट घेतली. यातच आता सोलापुर शहर मध्यची जागा ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला मिळावी यासाठी आघाडीच्या नेत्यांसह कॉंग्रेसच्या पक्ष श्रेष्ठींकडे निर्णय झाला तर मला कोणतीही हरकत नाही. असा शब्द आडम यांनी दिल्याचे सांगितले.
हेही वाचा…भोसरीचे चाणक्य विलास लांडे आढळरावांच्या सोबतीला, लांडेंच्या भेटीतून आढळरावांचे पारडे जड
दरम्यान, सोलापुर शहरातून तीन वेळा आमदार राहिलेले आडम मास्तर हे प्रणिती शिंदेंचे कट्टर विरोधक मानले जातात. कामगारांचा नेता अशी ओळख असलेल्या आडम मास्तरांनी जाई जुई विचार मंचच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या प्रणिती शिंदेंना पराभव करत 2009 साली विधानसभेत एन्ट्री केली होती. त्यानंतर मात्र प्रणिती शिंदे यांनी त्यांचा पराभव केला.
यातच मागच्या सर्व निवडणुका पाहिल्या तर राष्ट्रीय पातळीवर माकपने जरी कॉंग्रेसला पाठिंबा दिला तरी सोलापुरात माकप कॉग्रेसच्या विरोधात असायचा. मात्र यावेळी सगळे चित्र बदललं आहे. यातच आता विधानसभेचा शब्द देऊन आडम लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांना साथ देणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मी मुरलीची मुरली वाजवतो की आव्हाडांची पुंगी वाजवतो, हे भविष्यात दिसेल”, वसंत मोरेंनी फटकारलं
हेही वाचा…“मोहोळांच्या पाठीशी आता ब्राम्हण समाज मैदानात”, मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी पाठिंबा जाहीर
हेही वाचा…“तुमच्या “धन की बात” ला आमची “जन की बात” भारी पडणार”, ओमराजे निंबाळकर यांचा विरोधकांवर एल्गार
हेही वाचा…अर्चना पाटलांच्या दौऱ्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, प्रचाराला दमदार सुरूवात
हेही वाचा…“काल सुर्यग्रहण, अमावस्या, आणि मोदींची सभा, हा फार विचित्र योग”, उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल