धाराशिव : महाविकास आघाडीचे धाराशिव लोकसभेचे अधिकृत उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या प्रचाराला सुरूवात केली आहे. तर दुसऱ्या बाजूला महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी देखील आपला प्रचार सुरू केला आहे. यातच आता दोन्ही उमेदवारांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू झाल्या आहेत. अशातच आता ही निवडणुक मालक विरूद्ध सेवक अशी आहे. त्यामुळे जनतेने याचा विचार करावा. असे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“हरण्याच्या भीतीने मुनगंटीवारांचा तोल ढळला “, चंद्रपुरच्या सभेत विखारी भाषा
धाराशिवमध्ये समोरील उमेदवार ठरला आहे आणि त्यामुळे निवडणूक ही आता पक्षातील राहिली नसून जनतेला “मालक हवा की सेवक” ही ठरवणारी राहिली आहे. धाराशिव ने 40 वर्षे “घराणाशाही” अनुभवली नव्हे अक्षरशः सोसली आहे आणि आता तुम्ही जनतेचे मालक बनून जनतेवरच रुबाब करण्याचे दिवस इतिहास जमा झाले आहेत. तुमच्या “धन की बात” ला आमची “जन की बात” भारी पडणार हे नक्की. असा इशारा ओमराजे निंबाळकर यांनी दिला आहे.
हेही वाचा…“कोकणचा कॅलिफोर्निया हे स्वप्न सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही”, तटकरेंनी मतदारांना दिला शब्द
तर तुमच्याकडे संस्था, वारेमाप पैसा असेल पण माझ्याकडे जीवाला जीव देणारी जनता आहे. “शिवराज नानाभाऊ नांगरे” नावाच्या एका शेतकरी बांधवाने आज मला निवडणूक खर्चासाठी प्रेमापोटी 10000 रुपयेच चेक पाठवला आहे. याच्या 10000 ची सर “50 खोके” वाल्यांना कधीच येणार नाही. शेतकरी तीव्र दुष्काळ सामना करीत आहे आणि त्यातही स्वतःच पोटाला चिमटा घेऊन मला पैसे पाठवत आहेत हीच माझी “कमाई”. असेही ते म्हणाले.
तसेच असे अनेक हितचिंतक मला मदत करू इच्छित आहे. या सर्वांचे मनापासून धन्यवाद. जिथे लोक राजकारण्यांना शिव्या देऊन राजकारण हा धंदा बनलाय असे मानतात अशा वेळी समाजातील सर्व स्तरातील लोक मला यथाशक्ती मदत करत आहेत यातच सगळे आले आहे. त्यामुळे जनतेला मालक नको आणि सेवक हवाय हे नक्की. मी कायमच आपल्या जनतेच्या सेवेत आहे व राहील. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…अर्चना पाटलांच्या दौऱ्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, प्रचाराला दमदार सुरूवात
हेही वाचा…“काल सुर्यग्रहण, अमावस्या, आणि मोदींची सभा, हा फार विचित्र योग”, उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
हेही वाचा…“मोदींमुळेच निवडून आलो म्हणायचं,अन् पुन्हा त्यांनीच..,” राजेंद्र राऊतांनी निंबाळकरांचा घेतला चांगलाच समाचार
हेही वाचा…भोसरीचे चाणक्य विलास लांडे आढळरावांच्या सोबतीला, लांडेंच्या भेटीतून आढळरावांचे पारडे जड
हेही वाचा…आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर, २१,१७,१० महाविकास आघाडीत ठाकरेच मोठा भाऊ