धाराशिव : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अर्चना पाटील यांनी आपल्या मतदारसंघात प्रचाराला दमदार सुरूवात केली आहे. यातच काल अर्चना पाटील यांनी कळंब आणि औसा तालुक्यातील विविध गावांना भेटी देत मतदारांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे आमदार अभिमन्यु पवार यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी अर्चना पाटील यांच्या या दौऱ्यांना नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा…“कोकणचा कॅलिफोर्निया हे स्वप्न सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही”, तटकरेंनी मतदारांना दिला शब्द
औसा विधानसभा मतदार संघातील हासुरी, हरी जवळगा, मदनसुरी, भूतमुगळी, सरवडी, एकोजी मुदगड या गावांना भेटी देऊन प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिकांच्या घरी कॉर्नर बैठका घेऊन मतदारांशी संवाद साधला.. येत्या ७ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत ‘घड्याळ’ चिन्हासमोरील बटन दाबून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचे हात बळकट करावे, असे आवाहन यानिमित्ताने केले.. यावेळी आमदार अभिमन्यू पवार, शोभाताई पवार, महायुतीतील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कळंब तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन सत्कार केला व यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा…“जानकरांना शिट्टी तर वंचितच्या उमेदवाराला प्रेशर कुकर चिन्ह”, अकोल्यात तिरंगी लढत अटळ
कळंब तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.. यावेळी तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजी लकडे, राष्ट्रवादी वक्ता प्रवक्ता विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुशील शेळके, किसान सेल जिल्हाध्यक्ष प्रकाश बावणे, तालुका उपाध्यक्ष आगतराव कापसे, कार्याध्यक्ष गणेश भोसले, तालुका सचिव आबासाहेब अडसूळ यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना मी शिफारस केलेला उमेदवार महायुतीने दिल्याचा आनंद असल्याचे सांगत अर्चना पाटील यांचा विजय होईल असा विश्वास आमदार अभिमन्यु पवार यांनी व्यक्त केला.
READ ALSO :
हेही वाचा…“काल सुर्यग्रहण, अमावस्या, आणि मोदींची सभा, हा फार विचित्र योग”, उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
हेही वाचा…“मोदींमुळेच निवडून आलो म्हणायचं,अन् पुन्हा त्यांनीच..,” राजेंद्र राऊतांनी निंबाळकरांचा घेतला चांगलाच समाचार
हेही वाचा…भोसरीचे चाणक्य विलास लांडे आढळरावांच्या सोबतीला, लांडेंच्या भेटीतून आढळरावांचे पारडे जड
हेही वाचा…आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर, २१,१७,१० महाविकास आघाडीत ठाकरेच मोठा भाऊ
हेही वाचा…“हरण्याच्या भीतीने मुनगंटीवारांचा तोल ढळला “, चंद्रपुरच्या सभेत विखारी भाषा