पुणे : प्रकाश आंबेडकर यांनी वसंत मोरे यांच्यामध्ये असे संविधानातले कोणते गुण पाहिले ? संविधानासाठी त्यांनी कुणी पाहिलं नाही. कुठल्या दलितांच्या मदतीला ते गेले नाहीत. वंचितचं हे गणित कळत नाही. असे म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वंसत मोरे यांच्यावर टिका केली. त्यावर आता मी मुरलीची मुरली वाजवतो की जितेंद्र आव्हाडांची पुंगी वाजवतो हे भविष्यात कळेल. असा पलटवार वसंत मोरे यांनी केला आहे.
हेही वाचा…भोसरीचे चाणक्य विलास लांडे आढळरावांच्या सोबतीला, लांडेंच्या भेटीतून आढळरावांचे पारडे जड
चेहऱ्यावरून नव्हे तर वसंत मोरे यांच्या कामावरून प्रकाश आबंडेकर मला ओळखतात. ही माझ्या कामाची पावती आहे. जितेंद्र आव्हाडांना कधी वसंत मोरेंचं काम बघण्याची संधी मिळाली नाही. ज्या भागात मी नगरसेवकर आहेत. तिथे १५ वर्षात मी केलेले काम पाहायचे असेल तर जितेंद्र आव्हाड यांनी मला एक दिवस द्यावा. माझ्या वार्डाची सहल करून आणतो. मग वसंत मोरेंचं काम काय, किती लोकांनासाठी काम करतो हे कळेल असा जोरादर प्रहारही त्यांनी केलाय.
हेही वाचा…आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर, २१,१७,१० महाविकास आघाडीत ठाकरेच मोठा भाऊ
दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की, एवढ्या पक्षाचा नेता इतक्या खालच्या पातळीवर बोलत असेल तर मी मुरलीची मुरली वाजवतो की जितेंद्र आव्हाडांची पुंगी वाजवतो हे भविष्यात दिसेल. पुण्यात आले, इथं बोललं, जितेंद्र आव्हाड यांनी जो गरिबांवर अन्याय केलाय. फेसबुकवर लिहिलेल्या एकाला घरात बोलावून मारलं. असा नेत्याला सर्वसामान्यांचे दुख काय कळणार? वसंत मोरेंचं तुम्हाला आवाहन आहे. मी काय काम केले असेल तर पाहायला पुण्यात या असेही मोरेंनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“मोहोळांच्या पाठीशी आता ब्राम्हण समाज मैदानात”, मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी पाठिंबा जाहीर
हेही वाचा…“तुमच्या “धन की बात” ला आमची “जन की बात” भारी पडणार”, ओमराजे निंबाळकर यांचा विरोधकांवर एल्गार
हेही वाचा…अर्चना पाटलांच्या दौऱ्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, प्रचाराला दमदार सुरूवात
हेही वाचा…“काल सुर्यग्रहण, अमावस्या, आणि मोदींची सभा, हा फार विचित्र योग”, उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
हेही वाचा…“मोदींमुळेच निवडून आलो म्हणायचं,अन् पुन्हा त्यांनीच..,” राजेंद्र राऊतांनी निंबाळकरांचा घेतला चांगलाच समाचार