बारामती : बारामती लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. यातच ज्याठिकाणी पवार आडनाव दिसेल तिथेच मतदान करा असे म्हणत आधी साहेबांना मग मुलीला निवडून दिलं आता सुनेला निवडून द्या. असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. बारामती येथे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी आले असता ते एका कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.
हेही वाचा…“काल सुर्यग्रहण, अमावस्या, आणि मोदींची सभा, हा फार विचित्र योग”, उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
यावेळी अजित पवार म्हणाले की, आपण तर पहिल्यांपासून पवारांच्या पाठीशी राहिलो आहे. मग आता बारामतीकरांच्या समोर आपण काय करायचं? असा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशीही आता ज्याठिकाणी पवार आडनाव असेल तिथे मतदान करायचं. त्यामुळे तुम्हाला कुठेही या प्रश्न येणार नाही. तसेच जी परंपरा आपण पाळत आलो आहोत. ती परंपरा खंडीत केली नाही, अशीही भावना निर्माण होणार नाही, असेही अजित पवारांनी म्हटलं.
हेही वाचा…“मोदींमुळेच निवडून आलो म्हणायचं,अन् पुन्हा त्यांनीच..,” राजेंद्र राऊतांनी निंबाळकरांचा घेतला चांगलाच समाचार
1991 साली खासदारकीला लेकाला निवडून दिलं. त्यानंतर वडिलांना निवडून दिलं. त्यानंतर लेकीला तीन वेळा निवडून दिलं आणि आता सुनेला निवडून द्या. असे आवाहनही अजित पवारांनी बारामतीकरांना केलं. त्यावर लेकही खुश, कन्याही खूश, सुनही खुश आणि तुम्हीपण खुश असे म्हणत अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली. त्यावर उपस्थितांचा एकदाच हश्शा पिकला.
READ ALSO :
हेही वाचा…कट्टर विरोधकांचा प्रणिती शिंदेंना पाठिंबा, सोलापुरात प्रणिती शिंदेंची ताकद वाढली
हेही वाचा…“मी मुरलीची मुरली वाजवतो की आव्हाडांची पुंगी वाजवतो, हे भविष्यात दिसेल”, वसंत मोरेंनी फटकारलं
हेही वाचा…“मोहोळांच्या पाठीशी आता ब्राम्हण समाज मैदानात”, मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी पाठिंबा जाहीर
हेही वाचा…“तुमच्या “धन की बात” ला आमची “जन की बात” भारी पडणार”, ओमराजे निंबाळकर यांचा विरोधकांवर एल्गार
हेही वाचा…अर्चना पाटलांच्या दौऱ्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, प्रचाराला दमदार सुरूवात