मुंबई : राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला महाविकास आघाडीत एकूण १० जागा वाट्याला आल्यात. काल महाविकास आघाडीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी जागांवाटपाचा कार्यक्रम घोषीत करण्यात आला. शरद पवारांनी याआधीच आपल्या काही उमेदवारांची घोषणा केली होती. यातच आता सातारा आणि रावेर लोकसभा मतदारसंघाबाबत आपला उमेदवार घोषीत केला आहे.
हेही वाचा…अजितदादाच्या उमेदवाराच्या गाड्याची भाजपकडून तोडफोड ; पवार गटाची भाजपच्या विरोधात आयोगाकडे धाव
सातारा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी अचानकपणे माघार घेतल्याने उमेदवार निवडीचा पेच निर्माण झाला. यामधून अनेक इच्छूकांनी आपली नावं समोर आणलीत. मात्र शरद पवार यांनी आता सातारा लोकसभा मतदारसंघात शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने याठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला.
रावेर लोकसभा मतदारसंघातून एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र खडसेंनी त्याला विरोध केला. त्यामुळे आता भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांच्या विरोधात शरद पवार गटाने श्रीराम पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे याठिकाणी आता खडसे विरूद्ध पाटील अशी लढत निश्चित झाली आहे.
हेही वाचा…“आधी साहेबांना मग मुलीला अन् आता सुनेला निवडून द्या”, बारामतीत अजित पवारांची जोरदार फटकेबाजी
दरम्यान, शरद पवारांनी याआधी महाविकास आघाडीच्या कोट्यातून मिळालेल्या दहा जागांपैकी शरद पवारांनी नऊ जागांवर आपले उमेदवार घोषीत केले आहे. माढा लोकसभा मतदारसंघात अजूनही उमेदवार घोषीत केला नाही. याठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीवर अजूनही शंका उपस्थित केली जात आहे. त्याआधी शरद पवारांनी वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमर काळे, दिंडोरीतून भास्कर भगरे, बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, अहमदनगरमधून निलेश लंके, बीडमधून बजरंग सोनवणे, तर भिवंडीतून बाळ्या मामा म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे.
तुतारीच्या साथीने महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत अधिक बुलंद करण्यासाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक २०२४ ची तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. चला, आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबतीने सेवा-सन्मान आणि… pic.twitter.com/XUHuXOh88P
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) April 10, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“जर मी तोंड उघडलं तर यांना फिरता येणार नाही”, अजित पवारांनी बारामतीत ‘नेमका’ कुणाला दिला इशारा
हेही वाचा…“कामं मी केलीत अन् श्रेय विद्यमान खासदारानं घेतलं”, अजित दादांनी सुप्रिया सुळेंचा पाडाच वाचला
हेही वाचा…“तटकरेंना प्रचंड मतांनी खासदार करण्यासाठी झपाटून कामाला लागा”, अदिती तटकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
हेही वाचा…चंद्रहार पाटलांकडून विशाल पाटलांना पुन्हा साद, म्हणाले..”तर तुम्ही आता …”
हेही वाचा…“मोहोळांच्या साधेपणाने पुणेकरांची जिंकली मनं”, रांगेत उभं राहून घेतलं तांबडी जोगेश्वरीचं दर्शन