सांगली : महाविकास आघाडीत सांगलीची जागा ठाकरे गटाला गेल्याने कॉंग्रेसचे विशाल पाटील यांचे समर्थक नाराज होत आक्रमक झाले आहेत. सांगलीच्या जागेची घोषणा झाल्यानंतर कॉंग्रेसचे विशाल पाटील तसेच सत्यजित कदम नॉटरिचेबल झाले आहेत. तर आमचं चुकलं काय ? आता जनतेच्या कोर्टात लढायचं ? असे पोस्टर पाटील यांच्या समर्थकांकडून लावण्यात येत आहेत.
हेही वाचा…“मोहोळांच्या पाठीशी आता ब्राम्हण समाज मैदानात”, मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी पाठिंबा जाहीर
त्यात आता ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटलांनी विशाल पाटलांना पुन्हा एकदा साद घातली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझी उमेदवारी अगोदरच जाहीर केली होती. आज महाविकास आघाडीकडून माझ्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला आहे. सर्व महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते माझा प्रचार करतील.
हेही वाचा…“तुमच्या “धन की बात” ला आमची “जन की बात” भारी पडणार”, ओमराजे निंबाळकर यांचा विरोधकांवर एल्गार
तसेच उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासहित वरिष्ठ नेत्यांची सांगलीत सभा घेणार आहेत. येत्या दोन दिवसांत महाविकास आघाडीतील घटक पक्षांची भेट घेऊन प्रचाराचे नियोजन केले जाणार आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रहार पाटलांनी दिली आहे.
याचबरोबर विशाल पाटील यांच्या संभाव्य बंडखोरीवर बोलताना त्यांनी पूर्वी देखील मी विशाल पाटील यांना आवाहन केले होते की विशाल पाटील यांना जरी उमेदवारी जाहीर झाली तर मी त्यांचा प्रचार करीन. माझी उमेदवारी जाहीर झाली तर तुम्ही माझा प्रचार करा. त्याच पद्धतीने विशाल पाटील यांनी देखील मला विजय करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन चंद्रहार पाटलांनी केले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मोहोळांच्या साधेपणाने पुणेकरांची जिंकली मनं”, रांगेत उभं राहून घेतलं तांबडी जोगेश्वरीचं दर्शन
हेही वाचा…अजितदादाच्या उमेदवाराच्या गाड्याची भाजपकडून तोडफोड ; पवार गटाची भाजपच्या विरोधात आयोगाकडे धाव
हेही वाचा…“आधी साहेबांना मग मुलीला अन् आता सुनेला निवडून द्या”, बारामतीत अजित पवारांची जोरदार फटकेबाजी
हेही वाचा…कट्टर विरोधकांचा प्रणिती शिंदेंना पाठिंबा, सोलापुरात प्रणिती शिंदेंची ताकद वाढली
हेही वाचा…“मी मुरलीची मुरली वाजवतो की आव्हाडांची पुंगी वाजवतो, हे भविष्यात दिसेल”, वसंत मोरेंनी फटकारलं