पुणे : स्वागत नवं वर्षाचे, आशा-आकांशाचे , सुख समृद्धीचे पडता पाऊ दारी गुढीचे असे म्हणत आज संपुर्ण राज्यात नुतन वर्ष तथा गुढीपाडवाचा सण साजरा केला जात आहेत. गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज पुण्यात ठिकठिकाणी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली. अशातच पुणे लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी रांगेत उभं राहून पुण्यातील तांबडी जोगेश्वरी माता मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यांचा हा साधेपणा अनेकांना भावून गेला.
हेही वाचा…“तुमच्या “धन की बात” ला आमची “जन की बात” भारी पडणार”, ओमराजे निंबाळकर यांचा विरोधकांवर एल्गार
महायुतीकडून मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्यांनी आपल्या प्रचाराला सुरूवातही करून दिली आहे. यातच आज गुढीपाडव्याच्या दिवशी मोहोळ यांनी पुण्यातील प्रसिद्ध तांबडी जोगेश्वरी माता मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी मंदिरात लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. इतकी गर्दी असतांनाही मोहोळ यांनी रांगेत उभं राहून दर्शन घेतले. मोहोळांचा हा साधेपणा पाहून अनेक पुणेकर भावूक झाल्याचे दिसून आले.
हेही वाचा…अर्चना पाटलांच्या दौऱ्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, प्रचाराला दमदार सुरूवात
दरम्यान, मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजपा नेते हेमंत रासने तसेच कार्यकर्ते देखील होते. या सर्वांनी तांबडी जोगेश्वरीच्या चरणी माथा टेकवला. त्यानंतर आम्ही आज तांबडी जोगेश्वरीची गुढी उभारली. आता पुढे विजयाचीही गुढी उभारणार अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. यात पुणे लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे. महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर तर वंचितकडून वसंत मोरे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…अजितदादाच्या उमेदवाराच्या गाड्याची भाजपकडून तोडफोड ; पवार गटाची भाजपच्या विरोधात आयोगाकडे धाव
हेही वाचा…“आधी साहेबांना मग मुलीला अन् आता सुनेला निवडून द्या”, बारामतीत अजित पवारांची जोरदार फटकेबाजी
हेही वाचा…कट्टर विरोधकांचा प्रणिती शिंदेंना पाठिंबा, सोलापुरात प्रणिती शिंदेंची ताकद वाढली
हेही वाचा…“मी मुरलीची मुरली वाजवतो की आव्हाडांची पुंगी वाजवतो, हे भविष्यात दिसेल”, वसंत मोरेंनी फटकारलं
हेही वाचा…“मोहोळांच्या पाठीशी आता ब्राम्हण समाज मैदानात”, मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी पाठिंबा जाहीर