पुणे : महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवारांनी बारामतीत सभा घेतली. या सभेत त्यांनी निवडणुकीबाबात जोरदार फटकेबाजी केली. तर मी केलेल्या कामांचं श्रेय विद्यमान खासदारांनी घेतलं. असा दावाही त्यांनी केला. तर “याआधी फॉर्म भरल्यानंतर फक्त शेवटची सभा बारामतीत व्हायची, आता का फिरावं लागतं आहे? असा सवालही त्यांनी यावेळी विरोधकांना केला.
हेही वाचा…“आधी साहेबांना मग मुलीला अन् आता सुनेला निवडून द्या”, बारामतीत अजित पवारांची जोरदार फटकेबाजी
यावेळी अजित पवार म्हणाले की, “याआधी फॉर्म भरल्यानंतर फक्त शेवटची सभा बारामतीत व्हायची, आता का फिरावं लागतं आहे? आता हे का करावं लागतं आहे? प्रशासनावर माझी पकड नाही का? मी फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जातोय. हा विकासाचा रथ पुढे घेऊन जायचं असेल तर भावनिक होऊ नका. घड्याळाशिवाय पर्याय नाही”, असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांना सुनावलं आहे.
हेही वाचा…कट्टर विरोधकांचा प्रणिती शिंदेंना पाठिंबा, सोलापुरात प्रणिती शिंदेंची ताकद वाढली
“मी आजही तोलून मापून बोलतो आहे. जर मी तोंड उघडलं तर यांना फिरता येणार नाही. काही जण म्हणतात त्यांना धमकावले जात आहे. मी कशाला धमकावू? आज अनेक जण म्हणतात, मी पक्ष चोरला. आज ८० टक्के आमदार माझ्यासोबत आहेत. तुम्ही म्हणाल ते बरोबर कसे? मी कुणालाही अडचणीत आणणार नाही. पण कामे करण्याची ताकद कुणाकडे आहे? अजून १० वर्ष काम कोण करू शकतं? बारामतीत काय करायचं हे तुम्ही ठरवा. बाकी ५ विधानसभा मतदारसंघात आपला उमेदवार आघाडीवर असेल.” असेही ते म्हणाले.
दरम्यान, पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले की, “जे तुम्ही सांगितले ते मी आजपर्यंत केलं. काही लोकांचं काम मला कळत नाही. आताच्या खासदारांनी पत्रक काढले, पण त्यातील 90 टक्के कामं मीच केलेली आहेत. पोलीस उपमुख्यालाय, नगरपालिका, पोलीस ठाणे, पंचायत समिती, रस्ते ही कामं मीच केली. मी कऱ्हा नदीवरचे सगळे बंधारे नवीन करायला सांगितले आहेत. नाझरे धरणात पाणी आणण्याचा प्लॅन माझ्या डोक्यात आहे. केंद्राचा निधी आपल्याकडे येत नव्हता. आपला उमेदवार निवडून आला तर माझी ही कामे करा असे मी मोदींना सांगेन.”, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“कामं मी केलीत अन् श्रेय विद्यमान खासदारानं घेतलं”, अजित दादांनी सुप्रिया सुळेंचा पाडाच वाचला
हेही वाचा…“तटकरेंना प्रचंड मतांनी खासदार करण्यासाठी झपाटून कामाला लागा”, अदिती तटकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
हेही वाचा…चंद्रहार पाटलांकडून विशाल पाटलांना पुन्हा साद, म्हणाले..”तर तुम्ही आता …”
हेही वाचा…“मोहोळांच्या साधेपणाने पुणेकरांची जिंकली मनं”, रांगेत उभं राहून घेतलं तांबडी जोगेश्वरीचं दर्शन
हेही वाचा…अजितदादाच्या उमेदवाराच्या गाड्याची भाजपकडून तोडफोड ; पवार गटाची भाजपच्या विरोधात आयोगाकडे धाव