भंडारा : सध्या लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय नेत्यांचे दौरे वाढले आहेत. अशातच प्रचार सभा आटोपून परत येत असताना भंडारा शहरालगतच्या भिलेवाडा गावाजवळच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारचा मंगळवारी भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताच्या वेळी पटोले गाडीत नसतांना त्यांना कोणतीही दुखापत न झाल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…“जर मी तोंड उघडलं तर यांना फिरता येणार नाही”, अजित पवारांनी बारामतीत ‘नेमका’ कुणाला दिला इशारा
प्रचारसभा आटोपून नाना पटोले माघारी येत होते. त्यावेळी भंडारा शहरालगतच्या भिलेवाडा गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास मागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत गाडीचे माठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने नाना पटोले हे थोडक्यात बचावले आहेत. ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा. असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
हेही वाचा…“कामं मी केलीत अन् श्रेय विद्यमान खासदारानं घेतलं”, अजित दादांनी सुप्रिया सुळेंचा पाडाच वाचला
दरम्यान, यावर नाना पटोले यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. काल भंडाऱ्यात आमच्या गाडीला एका ट्रकने मुद्दामून धडक देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांनी एका बाजूने गाडीला पूर्ण घासत नेलं, आम्ही तर सुखरूप आहोत पण गाडीचं पूर्ण नुकसान झालं, जनतेच्या आशिर्वाद आणि प्रेमामुळे मी आज सुखरूप आहे. हा घातपात आहे का याचा पोलीस तपास करतील. असेही त्यांनी म्हटले आहे.
काल भंडाऱ्यात आमच्या गाडीला एका ट्रकने मुद्दामून धडक देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांनी एका बाजूने गाडीला पूर्ण घासत नेलं, आम्ही तर सुखरूप आहोत पण गाडीचं पूर्ण नुकसान झालं, जनतेच्या आशिर्वाद आणि प्रेमामुळे मी आज सुखरूप आहे. हा घातपात आहे का याचा पोलीस तपास करतील – मा. नाना… pic.twitter.com/Vr11Gpzjlt
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 10, 2024
READ ALSO :
हेही वाचा…मनसेचा महायुतीला पाठिंबा, पुण्यात मतांचं विभाजन, कुणाच्या पथ्यावर पडणार ?
हेही वाचा…रवींद्र धंगेकरांच्या पाठीमागे शुल्ककाष्ठ ; धंगेकरांचा प्रचार थांबवा; ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना वरिष्ठांच्या सूचना
हेही वाचा…“राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नव्हे तर महायुतीचा खासदार विजयी होणार”,अदिती तटकरेंचा विश्वास
हेही वाचा…“‘कळतं पण वळत नाही’ अशी भूमिका का घेतली जातेय?” राष्ट्रवादीने राज ठाकरेंना सुनावलं
हेही वाचा…सातारा अन् रावेरसाठी शरद पवार गटाचे उमेदवार घोषीत, माढ्याचा तिढा अजूनही कायम