रायगड : रायगड लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दापोली येथे महायुती व मित्रपक्ष भाजपचे बुथ कार्यकर्ता व सुपर वॉरियर्स संमेलन पार पडलं. यावेळी निवडणूक नियोजनासाठीही अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला महायुतीचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी पदाकाऱ्यांची संवाद साधताना रायगडमध्ये पुन्हा सुनील तटकरे यांच्या रूपानं राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नव्हे तर महायुतीचा खासदार विजयी होणार. असेही त्या म्हणाल्या. तसेच आपणा सर्वांना अभिमान वाटेल असं काम त्यांच्या हातून घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा…चंद्रहार पाटलांकडून विशाल पाटलांना पुन्हा साद, म्हणाले..”तर तुम्ही आता …”
यावेळी त्या म्हणाल्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपला देश प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. उपमुख्यमंत्रई अजितदादांच्या नेतृत्वाखाली रायगडसह संपुर्ण महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि बहुजनांच्या व्यापक हितासाठी आपण सत्तेत सहभागी झालो आहोत. त्यामुळे रायगडमध्ये पुन्हा सुनील तटकरे यांच्या रूपानं राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नव्हे तर महायुतीचा खासदार विजयी होणार. असे विधान मंत्री अदिती तटकरे यांनी रायगडमध्ये केले.
हेही वाचा…“मोहोळांच्या साधेपणाने पुणेकरांची जिंकली मनं”, रांगेत उभं राहून घेतलं तांबडी जोगेश्वरीचं दर्शन
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, सत्तेत असल्यावर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे करता येतात. महायुती आणि एनडीएच्या माध्यमातून विकास हेच आपलं लक्ष्य आहे. यापुढे येणारी प्रत्येक निवडणूक महायुतीच्या माध्यमातून आपण लढवणार असून खासदार म्हणून तटकरे साहेब आपल्यासोबत संपूर्ण ताकदीनं उभे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजपा, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे साहेबांना प्रचंड मतांनी रायगडचे खासदार म्हणून पुन्हा निवडून आणण्यासाठी झपाटून कामाला लागण्याचे आवाहन यावेळी तटकरे यांनी केले.
READ ALSO :
हेही वाचा…“‘कळतं पण वळत नाही’ अशी भूमिका का घेतली जातेय?” राष्ट्रवादीने राज ठाकरेंना सुनावलं
हेही वाचा…सातारा अन् रावेरसाठी शरद पवार गटाचे उमेदवार घोषीत, माढ्याचा तिढा अजूनही कायम
हेही वाचा…“जर मी तोंड उघडलं तर यांना फिरता येणार नाही”, अजित पवारांनी बारामतीत ‘नेमका’ कुणाला दिला इशारा
हेही वाचा…“कामं मी केलीत अन् श्रेय विद्यमान खासदारानं घेतलं”, अजित दादांनी सुप्रिया सुळेंचा पाडाच वाचला
हेही वाचा…“तटकरेंना प्रचंड मतांनी खासदार करण्यासाठी झपाटून कामाला लागा”, अदिती तटकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन