शिरूर : शिरूर लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच पवार विरूद्ध पवार असा सामना होत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील मैदानात उतरले आहेत. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी शरद पवार गटातील विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना पुन्हा संधी देण्यात आलीय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता दोन्हीही उमेदवारांनी आपला प्रचार करण्यास सुरूवात केली आहे. अशातच आढळराव पाटलांचे सुपुत्र अर्पुव पाटलांनी अमोल कोल्हेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.
हेही वाचा…“टकमक टोकावरून यावेळी अनंत गीतेंचा कडेलोट करणार”, भरत गोगावलेंनी अनंत गितेंना दिला कडक इशारा
शुक्रवारी मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा सण मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या रमजान ईदच्या निमित्ताने शिरूर लोकसभेचे महायतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांचे चिरंजीव अपूर्व शिवाजी आढळराव पाटील यांनी शिरूर तोकसभा मतदारसंघातीत भोसरी विधानसभा मतदारसंघात मुस्लिम बांधवांना भेटून ईदच्या शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा…“धुळ्यात शोभा बच्छावांना उमेदवारी जाहीर, कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा थेट राजीनामा”
या शुभेच्छा देताना अपूर्व आढळराव पाटीत यांनी मतदारांना आवाहन करताना सांगितले की, शिरूर लोकसभेचा खरा नायक म्हणजेच शिवाजी आढळराव पाटील यांना निवडून द्यावे. शिरूर लोकसभेच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवाजी आढळराव पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही असे अपूर्व शिवाजी आढळराव पाटील यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे उपनेते इरफान भाई सय्यद तसेच भारतीय जनता पार्टीचे पुणे उपाध्यक्ष किसन बावकर, युवासेना संपर्कप्रमुख संकेत चावरे व भारतीय जनता पार्टी चे नगरसेवक उत्तम केंदळे आदी कार्यकर्ते पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचा…शिवतारेंनी माघार घेतली, अजितदादांकडून बारामतीकरांसाठी आश्वासनांची खैरात वाटली
हेही वाचा…“कॉंग्रेस पक्षांतर्गत सुंदोपसुंदीने धंगेकर ग्रासले”, पक्षांतर्गत आणखी एक वाद चव्हाट्यावर
हेही वाचा…“शरद पवारांचा धृतराष्ट्र झालाय,” अजितदादा गटातल्या महिला नेत्याची कडाडून टिका
हेही वाचा…बारामतीत शिवतारेंचा बंड थंड का झाला ? शिवतारेंनीच केला मोठा खुलासा, म्हणाले….
हेही वाचा…देशहितासाठी ‘घड्याळ’ या चिन्हासमोरील बटन दाबून मोदींना पाठिंबा द्या”, अर्चना पाटलांचं मतदारांना आवाहन