रायगड : रायगड लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर महायुतीमध्ये समाविष्ट घटकपक्ष शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून जोरदार प्रचार सुरू आहे. १० एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ८ वाजता महाड तालुक्यातील लाडवली येथे महायुतीची सभा पार पडली. या सभेस जवळपास पाच हजार कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेत उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना विकास गोगावले यांनी गीतेंवर निशाणा साधत, अनंत गीते यांचा या लोकसभा निवडणुकीत टकमक टोकावरून कडेलोट करायचा आहे असा इशारा दिला.
हेही वाचा…“शेतकऱ्यांनी प्रश्न केला, अन् चंद्रकांत पाटलांना सभेतून काढता पाय घ्यावा लागला”, माढ्यात नेमकं काय घडलं ?
सुनिल तटकरे यांना २५ हजार पेक्षा जास्त लीड महाड विधानसभेतून असणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर कार्यकर्त्यांना सुनिल तटकरेंसाठी कामाला लागायच्या सूचना देखील यावेळी दिल्या. जगताप कुटुंबियांवर निशाणा साधत आम्हाला गद्दार म्हणणाऱ्या जगताप कुटुंबाने किती पक्ष बदलले हे लोकांना सांगा, याची आठवण करून दिली. अनंत गीते यांच्यावर कधीच भ्रष्टाचाराचा आरोप नाही असे म्हणणाऱ्यांना आपल्या अनोख्या शैलीत उत्तर देत त्यांनी कधी काम केलेच नाही त्यामुळे त्यांच्यावर आरोप निर्माण होण्याचा प्रश्नच नाही असे उपस्थितांना सांगितले.
हेही वाचा…“वहिनी..! बघा यंदा तुम्हीच खासदार होणार”, सुनेत्रा पवारांनी भोरमध्ये साधला महिलांशी संवाद
आमदार भरत गोगावले यांनी आपण केलेल्या साडे तीन हजार कोटींच्या विकास कामांचा पाढा यावेळी वाचला. अनंत गीते हे रायगड किल्यावर किती वेळा आले, रायगड किल्ल्यावर पायऱ्या किती आहेत हे तरी त्यांना माहीत आहे का? असा सवाल यावेळी उपस्थित केला. या निवडणुकीत अनंत गीतेंचा टकमक टोकावरून कडेलोट जनता करेल, असा इशारा सभेतून दिला. महाराष्ट्रातून निवडणूक आलेल्या टॉप १० खासदारांमध्ये सुनिल तटकरेंचा नंबर असेल असे यावेळी आश्वासित केले.
खासदार सुनिल तटकरे यांनी अनंत गीतेंना उद्देशून, ‘निष्क्रियतेचे दुसरं नाव अनंत गीते ‘ अशी टीका केली. सहा वेळा खासदार झालेल्या व्यक्तीच्या तोंडून विकासाचे शब्द येणं अपेक्षित आहे, परंतु अनंत गीतेंच्या तोंडून बाटलीत बंद करू, गद्दार, कडेलोट हेच शब्द कसे येतात असा सवाल याप्रसंगी त्यांनी उपस्थित केला.
तर जगताप कुटुंबियांवर निशाणा साधत, दिवंगत व्यक्तीबद्दल मी काहीही बोलणार नाही, परंतु माझ्याबद्दल असेच काहीही बोलत राहिलात तर गेल्या वीस वर्षाचा इतिहास मला मांडावा लागेल असा इशारा यावेळी दिला. आमदार भरत गोगावले हे त्यागमूर्ती आहेत, त्यांचं नाव पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात होत परंतु सरकार अडचणीत येऊ नये म्हणून मनाचा मोठेपणा या आमदाराने दाखवला म्हणून ते मंत्रीपदापासून वंचित राहिले असल्याचे सांगितले. कोकणचा सर्वांगीण विकास करण्यासाठी घड्याळ या चिन्हा समोरील बटण दाबून मला आपली सेवा करण्याची संधी देण्याचे आवाहन उपस्थित मतदारांना केले. महाड विधानसभा मतदार संघातून माझ्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली गेल्याने मी भरत गोगावलेंचे आभार मानतो, असे उद्गार यावेळी बोलताना सुनिल तटकरे यांनी काढले.
READ ALSO :
हेही वाचा…“धुळ्यात शोभा बच्छावांना उमेदवारी जाहीर, कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा थेट राजीनामा”
हेही वाचा…“शिवतारेंना माघार घेतांना कोणतं आश्वासन दिलं होतं,” ? शिवतारे अन् अजित पवारांनी केलं स्पष्ट
हेही वाचा…“गेल्या पाच वर्षात मतदारसंघात खासदार फिरकलाच नाही”,आढळरावांचा कोल्हेंना खोचक टोला
हेही वाचा…“वडेट्टीवार भाजपमध्ये जातील म्हणणाऱ्या आत्रामांना वडेट्टीवारांनी चांगलचं फटकारलं,” म्हणाले…
हेही वाचा…“अल्पसंख्याक समाज सुज्ञ, तो महायुतीच्या पाठीमागे 100 टक्के उभा राहिलं”, तटकरेंचा विश्वास