गडचिरोली : विजय वडेट्टीवार भाजपमध्ये जाण्यासंदर्भात ज्या काही बैठका, चर्चा झाल्या, त्यात मीही सहभागी होतो. त्यामुळे आज नाही तर उद्या विजय वडेट्टीवार भाजपमध्ये नक्की जाणार असा मोठा दावा मंत्री धर्मराव आत्राम यांनी केला आहे. त्यामुळे राज्यातील आणखी एक विरोधी पक्षनेता सत्तेत सामील होणार का ? अशी चर्चा सुरू झाली आहे. यावरून आता वडेट्टीवार यांनी आत्राम यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
हेही वाचा…मनसेच्या पाठिंब्यामुळे मोहोळांचं मताधिक्य वाढणार, काय सांगतात राजकीय गणितं?
विजय वडेट्टीवार कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते आहेत. ते अशोक चव्हाण यांचे राईट हॅंड आहेत. विजय वडेट्टीवार यांच्या गटातील गटातील तसेच नजीकचे मानले जाणारे अनेक नेते भाजपमध्ये गेले आहेत. ही एक प्रकाराची सुचक दिशा आहे की, वडेट्टीवार हे भाजपमध्ये जाणार आणि ही गोष्ट १०० टक्के खरी आहे. असेही आत्राम यांनी म्हटले आहे.
धर्मराव आत्राम यांच्या दाव्यानंतर वडेट्टीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, गडचिरोली- चिमूर लोकसभा निवडणूक आम्ही जिंकत आहोत, सर्व सूत्र हाती घेतली आहे. पराभव समोर दिसत आहे म्हणून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा विरोधकांकडून प्रयत्न केल्या जात आहे. भाजपमध्ये जाऊन जे गुलाम होऊन जगत आहेत त्यांनी एकदा आरश्यात पहावे. भाजपचा पराभव झाला तर माझे मंत्रीपद जाईल ही भीती त्यांना आता झोपू देत नाही. असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला आहे.
तसेच धर्मराव आत्राम हे फक्त नावाला राजे आहेत, बाकी भाजप समोर झुकलेले ते एक गुलाम आहे. स्वतःचा स्वाभिमान विकून ते भाजप समोर झुकले, त्यामुळे इतरांनी ही झुकावे ही त्यांची इच्छा आहे. पण आम्ही स्वाभिमानी आहोत, काँग्रेसला जिंकून देऊ ४ जून ला कळेल गडचिरोलीमध्ये कोण राजा आहे. धर्मराव अत्राम यांना माझे आव्हान आहे त्यांनी त्यांच्या मतदार संघात भाजपला लीड मिळवून द्यावे. असेही ते म्हणाले.
गडचिरोली- चिमूर लोकसभा निवडणूक आम्ही जिंकत आहोत, सर्व सूत्र हाती घेतली आहे. पराभव समोर दिसत आहे म्हणून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा विरोधकांकडून प्रयत्न केल्या जात आहे.
भाजपमध्ये जाऊन जे गुलाम होऊन जगत आहेत त्यांनी एकदा आरश्यात पहावे. भाजपचा पराभव झाला तर माझे… pic.twitter.com/UZe6u4hjeC
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) April 11, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“अल्पसंख्याक समाज सुज्ञ, तो महायुतीच्या पाठीमागे 100 टक्के उभा राहिलं”, तटकरेंचा विश्वास
हेही वाचा…“शेतकऱ्यांनी प्रश्न केला, अन् चंद्रकांत पाटलांना सभेतून काढता पाय घ्यावा लागला”, माढ्यात नेमकं काय घडलं ?
हेही वाचा…“वहिनी..! बघा यंदा तुम्हीच खासदार होणार”, सुनेत्रा पवारांनी भोरमध्ये साधला महिलांशी संवाद
हेही वाचा…“अपघात की घातपात”, नाना पटोलेंना संशय, देवेंद्र फडणवीस म्हणाले की…
हेही वाचा…“कार्यकर्त्यांची बाजू समजून घेऊन पुढे वाटचाल करू”, सांगलीच्या जागेवरून विश्वजित कदमांनी दिला इशारा