IMPIMP
danave danave

हाथरस प्रकरणाच्या चौकशीनंतरच त्यावर बोलणं योग्य होईल: रावसाहेब दानवे

मुंबई : सध्या देशात गाजत असलेलं हाथरस प्रकरणावर आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हाथरस प्रकरणाच्या चौकशीनंतरच त्यावर बोलणं योग्य होईल, अशी सावध प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली आहे. ‘हाथरस प्रकरणाची समितीमार्फत चौकशी केली जात आहे. अहवाल आल्यावरच या प्रकरणावर भाष्य करणे योग्य असेल,’ असे मत शनिवारी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले.

‘हाथरस’ प्रकरणी दानवे म्हणाले, ‘समितीची चौकशी संपल्यानंतर माध्यमांचे प्रतिनिधी, विरोधी पक्षातील नेते, लोकप्रतिनिधी यांनाही गावात जाण्यास मोकळकी असेल, असे सरकारने या आधीच स्पष्ट केले आहे.’ या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करा, अशी मागणी होत असल्याबद्दल विचारले असता त्यांनी मौन बाळगणे पसंत केले. उत्तर प्रदेशमधील हाथरस प्रकरण देशात प्रचंड गाजत आहे. उत्तर प्रदेश सरकार आणि प्रशासनावर ताशेरे ओढले जात आहेत. महिलांच्या सुरक्षेकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधक आणि महिला कार्यकर्ते सरकारवर करत आहेत.

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील घटनेने देश हादरला असून आता त्यावरून देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिक्रिया उमटत आहेत. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी आणि कॉंग्रेस महासचिव प्रियांका गांधी वाड्रा हाथरसमधील पिडीत कुटुंबातील लोकांना भेटण्यासाठी गेले असता त्यांना रस्त्यावर अडवून उत्तर प्रदेश पोलीसांनी धक्काबुक्की केली आहे. त्यानंतर ते काल हाथरस गेले होते. तिचे जाऊन त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

दरम्यान काल प्रियांका गांधींवर पोलिसांनी केलेल्या गैरवर्तनामुळे देशातील अनेक नेते सरकारवर टिका करत आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे १९ वर्षीय मुलीवर झालेला सामूहिक बलात्कार व त्यानंतर तिचा करण्यात आलेला अमानुष खुनामुळं सध्या देशात संतापाची लाट आहे. हाथरस अत्याचार प्रकरणावरुन देशभरात संतापाची लाट उसळली आहे. देशभरात या घटनेचा निषेध केला जात आहे.

केंद्र सरकाने मंजूर केलेल्या कृषी विधेयकासंदर्भात माहिती देण्यासाठी भाजपतर्फे दानवे यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, प्रदेश चिटणीस इद्रीस मुलतानी, शहराध्यक्ष संजय केणेकर, शिरीष बोराळकर, प्रवीण घुगे, अनिल मकरिये, प्रशांत देसरडा, प्रमोद राठोड, जिल्हाध्यक्ष विजय औताडे, प्रा. राम बुधवंत उपस्थित होते. याप्रसंगी दानवे म्हणाले, ‘काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अन्य पक्षांच्या नेतृत्वातील सरकारच्या काळात स्वामीनाथन आयोग आला, परंतु त्यांनी कुठल्याच शिफारशी लागू केल्या नाहीत़ आमच्या सरकारने या आयोगाच्या बहुतांश शिफारशी लागू केल्या. शेतीत नवनवीन तंत्रज्ञान आणण्यासाठीच्या उपाययोजनाही मोठ्या प्रमाणात केल्या. संसदेत मंजूर झालेले कृषी विधेयक हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणारे आहे. काँग्रेससह अन्य विरोधक केवळ राजकीय हेतूने त्यास विरोध करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

 

Read Also :