मुंबई : कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या बिग बॉस रिअॅलिटी शोमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा जान कुमार सानूनं मराठी भाषेबद्दल मानहानीकारक वक्तव्य केल्यानं संताप व्यक्त केला जात होता.शिवसेनेने दिलेल्या तीव्र इशाऱ्यानंतर अखेर कलर्स वाहिनीने घडलेल्या प्रकारबद्दल लेखी स्वरूपात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून माफी मागितली आहे.
मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या जान कुमार सानू ला BIG BOSS मधून हाकला, अन्यथा शो चालू देणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला होता. यासंदर्भात शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांनी कलर्स वाहिनीला अल्टिमेटम दिलं होता. जान कुमार सानूनं मराठी भाषेत बोलू नकोस, हिंदी भाषेत बोल असा अत्यंत चुकीच्या पद्धतीने आरडाओरडा करून मराठी भाषेचा अवमान केला आहे. मराठी भाषेची याला चीड येते, अशा संदर्भातलं वक्तव्य जान कुमार सानूनं केलं आहे.
त्या बद्दल कलर्स वाहिनीने जर मुजोर जान कुमार सानू याची या मालिकेतून हकालपट्टी केली नाही, तर सेटवर येऊन शिवसेना स्टाईल आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला होता. सलमान खानने स्पर्धकांना योग्य ती समज द्यावी, असं आवाहन देखील आमदार प्रताप सरनाईकांनी केलं होते.
काय म्हटलंय कलर्स वाहिनीने माफीनाम्यात
आम्ही आक्षेपार्ह मजकूराची दाखल घेतली आहे. तो शब्द आम्ही पूर्ण एपिसोडमधून काढून टाकू महाराष्ट्रातील मराठी माणसाचा अपमान करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता अनावधानाने झालेल्या चुकीबद्दल आम्ही माफी मागतो अश्या आशयाचे पत्र कलर्स वाहिनीने प्रसिद्ध केले आहे.तसेच आम्ही मराठीसह देशातील सर्व भाषांचा आदर करतो असे देखील या पत्रामध्ये कलर्स वाहिनीने म्हंटले आहे.
Read Also
त्या पुस्तकात CM ठाकरेंना दिलेला सल्ला आणि गृहमंत्री शहा यांनी घेतलेली दखल कुठे ? शरद पवार यांचे राज्यपालांना पत्र https://t.co/FtUcO6rxRU#SharadPawar #bhagatsinghkoshyari
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 28, 2020