IMPIMP
Jayant Patil Vidhan Parished Election Jayant Patil Vidhan Parished Election

शेकापच्या जयंत पाटलांना कॉंग्रेस अन् शरद पवार गटाचा पाठिंबा, परंतु ठाकरे गट…?

मुंबई : राज्यात येत्या १२ जूलै रोजी विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणुक होणार आहे. या जागांसाठी आता उमेदवारांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शेकापचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे देखील निवडणुक रिंगणात उतरणार असून त्यांना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने आपला पाठिंबा जाहिर केला आहे. मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अद्यापही प्रतिसाद मिळालेला नाहीय.

हेही वाचा..“अजित पवारांनी अन्याय केला का नाही ? “भाजप नेते हर्षवर्धन पाटलांचं मोठं विधान

राज्यातील विधान परिषदेतील ११ जणांची मुदत जुलै महिन्यात संपणार आहे. त्यासाठी आता पुन्हा १२ जुलै रोजी निवडणुक होत असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. आता निवडणुकीकरीता शेकापचे आमदार जयंत पाटील पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून त्यांना पाठिंबा आहे. परंतु रायगड लोकसभा निवडणुकीत शेकापकडून अपेक्षित मदत न झाल्याने आपण जयंत पाटील यांना पाठिंबा देऊ नये. अशी भावना ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी मांडली आहे.

हेही वाचा..“चंद्रकांत पाटलांनी आम्हाला चॉकलेट दिले असले तरी जे हलाहल पचवून शिवसेना उभी” 

दरम्यान, रायगड लोकसभा मतदारसंघातील पराभवाला मी एकटा जबाबदार नाही. आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचं काम केलं होतं. मात्र जनतेनं दिलेला तो कौल आहे. त्या निवडणुकीचा आणि आताच्या विधान परिषद निवडणुकीचा काहीही संबंध नाही. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचाही मलाच पाठिंबा असणार आहे. अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.

READ ALSO :

हेही वाचा..फडणवीस अन् ठाकरेंचा एकाच लिप्टमधून प्रवास, ठाकरे महायुतीत जाणार का ? 

हेही वाचा..भाजपकडून विधानपरिषदेच्या ०५ जागांसाठी ११ नावांचा विचार..! कुणाला मिळणार संधी ? 

हेही वाचा..भाजपच्या स्थानिक नेत्यांची अजितदादांवर नाराजी, 18 ते 19 आमदार शरद पवारांच्या संपर्कात 

हेही वाचा..“महाराष्ट्राचं राजकारण सहानुभतीवर चालतं, विधानसभेतही चालणार “

हेही वाचा..“तीनवेळा प्रयत्न केला, आता माघार नाही”? रमेश कोंडे भाजपच्या आमदाराची खोची करणार ? 

Leave a Reply