IMPIMP
Jitendra Awhad tore Ambedkar's poster, opponents attacked Awhad Jitendra Awhad tore Ambedkar's poster, opponents attacked Awhad

जितेंद्र आव्हाडांनी आंबेडकरांचा पोस्टर फाडलं, विरोधकांचा आव्हाडांवर जोरदार हल्लाबोल

रत्नागिरी : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, एससीईआरटीने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील दोन श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यावर आक्षेप आणि सुचनाही मागण्यात आल्या आहेत. अनेक पुरोगामी संघटना आणि राजकीय पक्षांनी राज्य सरकारच्या या प्रस्तावास विरोध दर्शवला आहे. हा विरोध दर्शवण्यासाठी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे आंदोलन केले. मात्र या आंदोलना दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पोस्टर फाडल्याने त्यांच्या विरोधात संपात व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा…“खर्गेंनी मोदींना डिवचलं,” तोच व्हिडीओ बावनकुळेंनी दाखवत राऊतांवर साधला निशाणा 

चवदार तळ्यावर जाऊन आव्हाडांनी मनुस्मृतीचं दहन करत जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. यावेळी त्यांच्या हातात मनुस्मृती असं नाव लिहिलेलं आणि त्यावर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावरून आता राज्यात भाजपसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आव्हाडांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी देखील याबाबत आव्हाडांचा व्हिडीओ ट्विट करत टिका केली आहे. जाहीर निषेध!जाहीर निषेध!स्टंटबाजीच्या नादात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडलेत. स्टंटबाजीत आपण काय मूर्खपणा केला हेही आव्हाडांच्या लक्षात येऊ नये आंबेडकर प्रेमी म्हणून या घटनेचा जाहीर निषेध! आव्हाडांनी तात्काळ देशाची माफी मागावी. असं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय.

हेही वाचा..“हाच आहे का महायुती सरकारचा गतिमान कारभार ?” पुण्याचे पालकमंत्री कुठे आहेत ? 

तर भाजपने देखील हाच व्हिडीओ ट्विट करत  चवदार तळ्याचा सत्याग्रह केलेल्या पवित्र ठिकाणी जितेंद्र आव्हाड  या विकृताकडून बाबासाहेबांचा अपमान झाला आहे.  जिथे गोर, गरीब आणि वंचितांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता. त्याच पवित्र ठिकाणी बाबासाहेबांचा फोटो फाडून अपमान करणाऱ्या विकृत मानसिकतेच्या जितेंद्र आव्हाडचा निषेध असं म्हणत जितेंद्र आव्हाड नाक घासून माफी माग अशीही मागणी केलीय.

दरम्यान, या संपुर्ण प्रकरणावर आता जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली आहे. आव्हाड म्हणाले की, भावनेच्या भरात मनुस्मृती त्यावर लिहिलं होतं म्हणून ते पोस्टर फाडले. त्यावर बाबासाहेबांचा फोटो होता. मला हे लक्षात आलं नाही. यावरून विरोधक राजकारण करणाच. माझ्या हातून चूक झाली आहे. मी याबाबत माफी मागतो. मनुस्मृती दिसलं म्हणून मी पोस्टर फाडलं. त्यावर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे, म्हणून तो फाडला असं कोणी म्हणत असेल तर तो मुर्ख आहे. असंही ते म्हणाले.

READ ALSO :

हेही वाचा..“..तर विशाल अग्रवालला वाचवणारी सगळी नावं समोर येतील”, पुणे अपघाताबाबत मोठी अपडेट समोर 

हेही वाचा.. पोर्श कारअपघात प्रकरणी सुनील टिंगेर अडचणीत, जगदीश मुळीकांची प्रकरणावर चुप्पी का ? 

 हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमधील शिष्टमंडळाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अक्षरश: झापले ! प्रकरण काय ? 

हेही वाचा..“गृहमंत्र्यांचं पुण्यासारख्या महत्वाच्या शहराकडे लक्ष नाही”,सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर टिका 

हेही वाचा..भाजपच्या जागेवर अजित पवार गटाने जाहीर केला उमेदवार, विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीत संघर्ष वाढणार