मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेले शाब्दिक युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही आहे. एकीकडे शिवसेनेच्या नेत्यांनी कंगनाबाबत बोलण्याचे टाळण्यास सुरुवाच केली असली तरी कंगना राणौतकडून याविषयी ट्विटरवरून टिवटिव सुरूच आहे. दरम्यान, आज कंगनाने शिवसेनेवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ शेअर करत कंगनाने शिवसेनेच्या सध्याच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे.
महान नेते असलेले बाळासाहेब ठाकरे हे माझे सर्वात आवडीच्या नेत्यांपैकी आणि आदर्शांपैकी एक होते. कधीतरी शिवसेना गटातटाच्या राजकारणात सामील होईल आणि काँग्रेस बनेल, अशी भीती त्यांना वाटायची. आता त्यांच्या पक्षाची सध्याची परिस्थिती पाहून त्यांची भावना काय असली असती.
Great Bala Saheb Thakeray one of my most favourite icons, his biggest fear was some day Shiv Sena will do Gutbandhan and become congress @INCIndia I want to know what is his conscious feeling today looking at the condition of his party ? pic.twitter.com/quVpZkj407
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 11, 2020
दरम्यान, कंगनाने याआधीच्या ट्विटमध्ये कंगनाने आपण बीएमसीने तोडलेले कार्यालय नव्याने बांधणार नसल्याचे सांगितले होते. मी १५ जानेवारीला हे कार्यालय सुरू केले होते. मात्र काही दिवसांतच कोरोना आला. त्यामुळे इतरांप्रमाणे मीसुद्धा तेव्हापासून काम केलेले नाही. आता नव्याने ऑफीस उभे करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही आहेत. त्यामुळे मी माझ्या तुटलेल्या ऑफीस, मधूनच काम करणार आहे. तसेच एका महिलेने जगाशी टक्कर घेतल्याची आठवण म्हणून जपून ठेवणार आहे.