मुंबई – अभिनेत्री कंगना रणौत सध्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. फक्त फिल्मच नाही तर राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवरूनही ती चर्चेत आहे. आपल्या बिनधास्त आणि सडेतोड बोलण्यामुळे ती नेहमी वादात असते. अशाच सर्व वादांमध्ये तिनं आपल्या फिल्मचा धडाकाही सुरूच ठेवला आहे.
कंगनानं नुकतंच थलाईवीचं शूटिंग पूर्ण केलं आणि आता तिनं आणखी एका राजकीय फिल्मची घोषणा केली आहे. ज्यामध्ये ती भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे.
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री कंगना रणौत आता भारताच्या पहिला महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारण्यास सज्ज झाली आहे. तिनं स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. या फिल्मचं नाव अद्याप माहित नाही. कंगना फक्त या फिल्ममध्ये अभिनय करणार नाही, तर ही फिल्म प्रोड्युसही करत आहे.
She was very beautiful, not pin up girl type beautiful, her face was like when all the swords are drawn just before the King’s command….- Khushwant Singh pic.twitter.com/p4IrHC4OWV
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 29, 2021
कंगना ट्विट केलं आहे की, “माझ्या करिअरच्या सुरुवातीला मी या आयकॉनिक महिलेच्या गेटअपमध्ये फोटोशूट केलं होतं. मला माहिती होतं एक दिवस मी या आयॉनिक लीडरची भूमिका स्क्रिनवर साकारेन”
या फिल्मची स्टोरी आणि स्क्रिनप्ले दिग्दर्शक साई कबीर यांनी लिहिलं आहे, जे ही फिल्म दिग्दर्शित करणार आहेत. एका पुस्तकावर ही फिल्म आधारित आहेत. ज्यामध्ये ऑपरेशन ब्लू स्टार आणि इंदिरा गांधी सरकारच्या कालावधीत देशात देशात जारी करण्यात आलेली आपात्कालीन परिस्थितीचा उल्लेख आहे. या फिल्ममध्ये इंदिरा गांधी यांच्याशिवाय राजीव गांधी, संजय गांधी, मोरारजी देसाई, लाल बहादूर शास्त्र असे बडे राजकीय नेत्यांच्या भूमिकेत बडे कलाकार दिसणार आहेत.