राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकारणाचा समृद्ध वारसा नातू आमदार रोहित पवार याना लाभला आहे. राजकारणासोबतच रोहित पवार यांचा साधेपणा हि देखील त्यांची ओळख आहे. रोहित पवार हे नेहमी गोरगरिबांना मदत करत असतात. नेहमी त्यांचा सुख दुःखात सहभागी होताना दिसतात.
असाच एक रोहित पवार यांच्यातील साधेपणा दिसणारा व्हिडीओ समोर आला आहे, हा व्हिडीओ जून महिन्यातील असून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता.
अहमनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार जून महिन्यात मतदार संघात दौरा करत होते. तिथे कर्जत तालुक्यातील कोरीगाव आणि आंबे – जळगाव मधील वस्तीवरच्या एका शेतकऱ्याच्या ते रात्री निवडक कार्यकर्त्यांसोबत गेले. तिथे त्यांना जेवणाचा आग्रह करण्यात आला. मात्र आपल्यासोबत इतर काही जण आहे असे सांगत रोहित पवार यांनी जेवणास नकार दिला. मात्र शेतकऱ्याचा घरच्यांनी प्रेमानी आग्रह केल्याने रोहित पवार जेवायला तयार झाले. मग चक्क शेणाने सारवलेल्या जमिनीवरच त्यांनी बैठक मांडली. आणि भाजी भाकरी आमटीचा त्यांनी मनोसोक्त आस्वाद घेतला.
तसेच जेवताना आस्थेवाईक पणे त्यांनी शेतकऱ्याच्या घरच्यांची त्यांनी चौकशी देखील केली. सर्वसामान्य माणसांमध्ये मिसळणारे रोहित पवार यांचा हा व्हिडीओ त्यांच्या साधेपणाचा प्रत्यय देणारा आहे.