कोरोना व्हायरसमुळे शालेय अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता कर्नाटकमधील भाजप सरकारने छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठे शाहीचा इतिहास पाठ्यपुस्तकातून गाळल्याचे समोर आले आहे.
शाळा अद्याप सुरू न झाल्याने अनेक राज्यांनी अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाठ्यपुस्तकातून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रशासन, त्यांचे उत्तराधिकारी, मराठेशाहीची स्थापना असा महत्त्वाचा भाग वगळला आहे. सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातून सरकारने टिपू सुलतानचा धडा देखील पाठ्यपुस्तकातून वगळण्याचा निर्णय घेतला होता, मात्र या निर्णयाला स्थिगिती दिली आहे.