पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत आता चांगलीच रंगत बघायला मिळत आहे. भाजपकडून किंवा महाविकास आघाडीकडून अद्याप कोणताही उमेदवार जाहीर केला नाही. यातच आता मनसे देखील कसबा पोटनिवडणुका लढण्याच्या तयारीत असल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. त्यामुळे याकडे आता सगळ्याचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
पिंपरी चिंचवड आणि कसबा विधानसभेच्या निवडणुका लढविण्यासाठी मनसेच्या काही कार्यकर्ते आग्रही आहेत. भाजपकडून अद्याप उमेदवारासंदर्भात कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. जर आमदारांच्या कुटुंबीयातील उमेदवारांना उमेदवारी दिली तर आम्ही त्याचा विचार करू. परंतु इतर कुणाला उमेदवारी दिली तर आम्ही साहेबांना निवडणुका लढविण्यासाठी विनंती करू. असं मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे यांनी सांगितले आहे.
यातच चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्या, यासाठी विरोधी पक्षांना पत्र पाठवणार आहे. असं पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी सांगितले आहे. तर कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून पाच जणांची नावं केंद्रीय निवडणुक समितीकडे पाठविली आहे. तर काॅंग्रेसने देखील यासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरूवात केली आहे.