मुंबई : महाराष्ट्र कोरोना व्हायरस महामारीच्या संकटात अडकला आहे. आरोग्य यंत्रणा कोलमडून पडल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर औषध उपलब्ध होताना दिसत नाही. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी आता 18 वर्षांपुढील सर्व नागरिकांना लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील हाफकिन संस्थेला लस उत्पादनाची परवानगी केंद्राने दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भात मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी राज ठाकरेंचे कौतुक केले आहे.
राज ठाकरे, आपण एका पत्राने केलेल्या मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्या. अपुनने एकही मारा लेकीन सॉलिड मारा के नाही?, असे म्हणत केदार शिंदे यांनी राज ठाकरेंचे कौतुक केले आहे.
@RajThackeray आपण एका पत्राने केलेल्या मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्या!! "अपुनने एकही मारा.. लेकीन सॅालिड माराके नाही" या काळात राजकारण न करता महाराष्ट्र जनतेच्या मागे उभा असलेला एकमेव "राजा" @mnsadhikrut pic.twitter.com/9YJ4EhgbOt
— Kedar Shindde (@mekedarshinde) April 19, 2021
कोरोना काळात राजकारण न करता महाराष्ट्र जनतेच्या मागे उभा असलेला एकमेव ‘राजा’, असेही केदार शिंदेंनी म्हणत राज ठाकरेंची भरभरून कौतुक केले आहे.
दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात पहिल्या लॉकडाऊनच्या काळात देखील अनेकजण आपल्या समस्या घेऊन राज ठाकरेंकडे जात असल्याचे दिसून आले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी लसींची संख्या वाढवण्यासाठी हाफकिन सारख्या संस्थांना लस निर्मितीची परवानगी द्यावी अशी मागणी आपण केली होती. यानंतर केंद्राकडून यासंदर्भात परवानगी मिळाली होती.